Home परभणी महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय जिंतूर येथे आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण ;...

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय जिंतूर येथे आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण ; तर कॅरीबॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई.

62
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220501-WA0067.jpg

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय जिंतूर येथे आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण ;
तर कॅरीबॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई.

ब्युरो चीफ:-
शत्रुघ्न काकडे पाटील
जिंतूर शहरात वारंवार सूचना देऊनही व्यापारी कॅरीबॅगचा सर्रास वापर करीत आहेत. त्यामुळे यापुढे कॅरीबॅग वापरत असल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा शुक्रवारी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे नूतन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिला आहे.यासंदर्भात त्यांनी व्यापाऱ्यांना कॅरीबॅग न वापरण्याचे आवाहन केले. नगरपालिका प्रशासन वारंवार सूचना देऊनही हात गाड्यावाले किराणा व्यापारी, फळ विक्रेते, औषधी दुकानदार तसेच अन्य किरकोळ विक्रेते कॅरीबॅगचा सर्रास वापर करीत आहेत.शासनाने वेळोवेळी सूचना देऊनही व्यापारी ऐकत नाहीत. त्यामुळे जिंतूर शहरात सक्तीने कॅरीबॅग बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी व्यापारीवर्गाने सहकार्य करावे, यापुढे कॅरीबॅग आढळल्यास पहिल्यावेळी ५ हजार, दुसऱ्यावेळी १० हजार, तिसऱ्या वेळी २५ हजारांचा दंड लावण्यात येणार आहे. तसेच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी कोकरे यांनी दिला. यावेळी (आमदार)मेघना बोर्डीकर, (तहसीलदार)सखाराम मांडवगडे,मुख्यकार्यकारी अधिकारी कोकरे, तहसील कर्मचारी, अधिकारी व नागरीक आदी जण उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here