Home नांदेड देगलूर पोलिसांची धाडसी कार्यवाही. चोरीस गेलेल्या 16 मोटरसायकली केल्या जप्त.

देगलूर पोलिसांची धाडसी कार्यवाही. चोरीस गेलेल्या 16 मोटरसायकली केल्या जप्त.

116
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर पोलिसांची धाडसी कार्यवाही. चोरीस गेलेल्या 16 मोटरसायकली केल्या जप्त.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रमोद कुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी देगलूर श्री सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक देगलूर श्री सोहन माछरे यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मोरे व टीम यांना मार्गदर्शन करून मोटरसायकल चोरांचा शोध लावने बाबत आदेशित केल्याने पोलीस उपनिरीक्षक श्री मोरे व त्यांची टीम यांनी मोटर सायकल चोरट्यांचा छडा लावण्याचा निर्धार करून कसोशीने आरोपीचा शोध घेत असताना सांगवि उमर येथील साहेबराव मरीबा कांबळे वय 37 वर्षे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून पोलीस ठाणे देगलूर गुन्हा रजिस्टर नंबर 148/2022 कलम 379 भा.द.वि. मधील फिर्यादी अनिल राजू अनमुलवार रा. देगलूर दिनांक 19- 3- 2022 रोजी जुनी नगरपालिका देगलूर समोरून चोरी केलेली मोटरसायकल क्रमांक MH 26 AH 6506 हस्तगत केली. त्याच्याकडून व त्याच्या साथीदाराने चोरी करून विक्रीसाठी त्याच्याकडे दिलेल्या विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या 16 मोटारसायकली किंमत 7,55000 रुपयाचे जप्त करण्यात आल्या असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरच्या मोटरसायकल शोध पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलिस हेड कॉ. मिरदोडे, पोलीस हे.कॉ.इंगोले, तलवारे,यम्मलवाड, मलदोडे आदींनी सहभाग घेतला होता. त्याबद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जप्त केलेल्या 16 मोटारसायकली पोलीस ठाणे देगलूर येथे ताब्यात घेण्यात आले असून कोणाच्या मोटारसायकली चोरी गेले आहेत त्यांनी देगलूर पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन देगलूर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here