Home Breaking News देवळा येथील वाखारी गटातुन शिवसंपर्क अभियानास सुरुवात.

देवळा येथील वाखारी गटातुन शिवसंपर्क अभियानास सुरुवात.

343
0

देवळा येथील वाखारी गटातुन शिवसंपर्क अभियानास सुरुवात.
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे साहेबयांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाची जोरदार सुरुवात झाली आहे….तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते मा.खा.संजय राऊत साहेब व उत्तर महाराष्ट्र समन्वयक मा.रविंद्र मिर्लेकर साहेब यांचे सुचनेनुसार तसेच नासिक जिल्हा संपर्कप्रमुख मा.भाऊसाहेब चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली ….. शिवसंपर्क अभियानास नासिक जिल्ह्यात जोरदार सुरुवात झाली आहे,हे अभियान १२ जुलै ते २४ जुलै दरम्यान राबविले जात आहे.याच पाश्वभुमिवर (दि.21) रोजी देवळा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाची वाखारी गटातुन बैठकिस सुरुवात झाली.त्यानंतर देवळा, खर्डा, भऊर, लोहोनेर गट, व नंतर ऊमराणे गटामध्ये हे अभियान ग्रामिणचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी जिल्हाप्रमुख पाटील यांनी शिवसंपर्क अभियानाची माहीती दिली,व हे अभियान राबविण्यचा उद्देश स्पष्ट केला, पक्षप्रमुखांचा वाढदिवस २७ तारखेला असल्याने व कोरोनाच्या पाश्वभुमिवर कोठेही बॕनरबाजी होवु नये गाजावाजा न होता,तसेच वायफळ खर्च न करता,तो खर्च समाजोपयोगी कामात खर्च व्हावा,व गरजु नागरीकांना अन्न धान्य द्यावे असे स्पष्ट निर्देश पक्षप्रमुखांचे असल्याने व त्यामाध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबवुन तळागाळातील जनतेपर्यंत पोहचणे व त्यांच्या समस्या सोडवुन सरकारच्या योजना नागरींकापर्यंत जावु देणे व त्याच बरोबर पक्षसंघटन मजबुत करणे हा उद्देश साध्य झाला पाहीजे असे जिल्हाप्रमुखांनी आपल्या भषणात सांगितले,तसेच कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात सात लाख मेर्ट्रीक टन धान्याचे वाटप झाले आहे, खरोखरच कुंटुबप्रमुख कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्राचा सांभाळ करीत आहे.बुथप्रमुख व शाखाप्रमुख यांनी घराघरात जावुन शिवसेनेची ध्येयधोरणे,व सरकारच्या योजना पोहचवीणे व गोरगरीब जनतेची कामे केलीत,तर हे अभियान यशस्वी झाले असे समजावे.
शिवसंपर्क अभियान दौर्यावेळी तालुकाप्रमुख सुनिल पवार, उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ तालुका संघटक बापु जाधव,युवसेना ता. प्रमुख रविबाबा चव्हाण,उपतालुकाप्रमुख विजय जगताप,भरत देवरे,वसंत सुर्यवंशी, ऊप तालुका संघटक भास्कर आहिरे,शहर प्रमुख मनोज आहेर,ऊप शहर प्रमुख देवा चव्हाण,नाजिम तांबोळी,नंदुआबा जाधव, विलास शिंदे,विजय आहेर, सतिष आहेर, जितेन्द्र भामरे ईश्वर निकम, दिपक आहेर, ,गट प्रमुख सुनिल शिरसाठ,ऊपेंन्द आहेर,भाऊसाहेब चव्हाण, गणेश देवरे, गण प्रमुख भास्कर पवार,दादाजी ठाकरे, शिवा पवार,ऊमराना शहर प्रमुख दिपक देवरे, ऊप शहर प्रमुख बंटी देवरे,दहिवडचे सरपंच आदीनाथजी,बंडू चव्हाण,तसेच गण व गट प्रमुख तसेच , जेष्ठ शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थ आदि उपस्थितीत होते.

Previous article🛑 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी होणार ‘ग्रॅज्युएट’, पाहा BA ची मार्कशीट 🛑
Next articleमालेगाव युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात बैलगाडी आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here