Home नांदेड मुखेडात डाॅ.आंबेडकर जयंती मिरवणुकीचे मुस्लिम बांधवांनी केले जल्लोषात स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी,...

मुखेडात डाॅ.आंबेडकर जयंती मिरवणुकीचे मुस्लिम बांधवांनी केले जल्लोषात स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी, शरबत सह मिनरल बाॅटलचे वाटप.

61
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेडात डाॅ.आंबेडकर जयंती मिरवणुकीचे मुस्लिम बांधवांनी केले जल्लोषात स्वागत.

फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी, शरबत सह मिनरल बाॅटलचे वाटप.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शहरासह तालुक्यात दि.१४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भीमजयंती मिरवणूकीचे फटाक्याच्या आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले. तसेच महामानवांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणूकीत सहभागी अनुयायींना शरबत वाटप व मिनरल बाॅटलचे वाटप करण्यात आले.
यावेळी आयोजक शेख इस्माईल बागवान म्हणाले की, रूढी-परंपरा, जातीयतेच्या गुलामीत खितपत पडलेल्या भारतीय समाजाला बाबासाहेबांनी मुक्त केलं. सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य बहाल केलं. संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधूतेचा संदेश दिला. अल्पसंख्याक समाजासह सर्वांना समान हक्क व अधिकार दिले. म्हणून मुखेड येथील मुस्लिम समाज बांधव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमाने साजरा केली. यावेळी डाॅ.राजासिंह चौहाण चौक, बसस्थानकासमोर शहरातील जयंती मंडळाचे प्रमुख गौतम काळे, राहूल लोहबंदे, अनिल सिरसे, व्यंकटराव लोहबंदे, मिलिंद कांबळे, संतोष बनसोडे, अनिकेत कांबळे, अतुल बनसोडे, संदिप काळे, आकाश कांबळे, एकनाथ बनसोडे, अनिकेत कांबळे, विजय लोहबंदे आदींचे पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम युवकांनी स्वागत केले. तसेच पोलिस निरिक्षक विलास गोबाडे, सहा.पोलिस निरीक्षक किशोर बोधगीरे, पि.एस.आय. गजानन काळे, डिएसबीचे केंद्रे, किरणकुमार वाघमारे, पोलिस पाटिल माधव टाकळे आदींवर पुष्पवृष्टी करुन पोलिस प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सुलतान मलिकसाब बागवान, गौस मिर्जा, इंजी.अतिक शेख, अमजत भाई, शेख इस्माईल बागवान, शेख रियाज चांदपाशा, अदनान पाशा, बाबु बागवान, खाजा चौधरी, सय्यद सोहेल, मदार दफेदार, यासेर अराफत, फेरोज बागवान, गणी भाई आदी सह मुस्लिम युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleदेगलूर पोलिसांची धाडसी कार्यवाही. चोरीस गेलेल्या 16 मोटरसायकली केल्या जप्त.
Next articleजात पडताळणी समता मोहिमेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here