Home विदर्भ लोणी येथील पिडीत कुंटुबाचे पुनर्वसन करा….!! ———मधुकरराव कांबळे

लोणी येथील पिडीत कुंटुबाचे पुनर्वसन करा….!! ———मधुकरराव कांबळे

109
0

राजेंद्र पाटील राऊत

लोणी येथील पिडीत कुंटुबाचे पुनर्वसन करा….!!
———मधुकरराव कांबळे
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मौजे लोणी खुर्द गावातील मातंग समाजाच्या वस्तीवर गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दि. 20/11/2021रोजी धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात मातंग समाजातील महिला,पुरूष,अबाल वृध्द व लहान मुले जखमी झाले होते. हा हल्ला एवढा भयंकर होता की हल्यातील पाच समाज बाधंवाना गंभीर स्थितीत उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते. तर काहींनी या हल्याच्या भिती पोटी गाव सोडून पलायन केले आहे. या हल्यातील जखमी पाच महिने उपचार घेऊन आपल्या गावात आले आहेत. सदर हल्ला प्रकरणी पोलिसांनी अनु जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पोलीस कारवाईचा वचपा काढण्यासाठी गावातील काहीनी या घटनेतील पिडीत कुटुंबासह इतर समाज बांधवांना किराणा न देणे, गिरणी वर दळण न दळून देणे.त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करणे, गावातील प्रमुख मार्गावरून जाण्यासाठी मज्जाव करणे. अशा प्रकारे बहिष्कार टाकला आहे. सदर बहिष्कार प्रकरणी.आज माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे याच्यां नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वाशिम यांची भेट घेऊन सदर पीडीत मातंग कुटुंबाला गिरणी, किराणा,सुवीधा उपलब्द व्हावी व स्वतंत्र, विद्युत पुरवठ्यासाठी डि पी देऊन, गावात जाण्यासाठी स्वतंत्रपणे रस्ता प्रशासनाने निर्माण करून देऊन मातंग समाज बांधवाचे पुर्नवसन करावे अशी मागणी. मा मुख्यमंत्री यांचे कडे केली आहे. सदर निवेदन एका शिष्टमंडळव्दारे जिल्हाधिकारी वाशिम यांना देण्यात आले. या वेळी, माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांच्यासोबत, पद्मश्री मा. नामदेव कांबळे, विनोद जोगदंड, कैलास थोरात, आत्माराम सुतार, संजय अंभोरे, संजय वैरागडे , रवीकुमार कांबळे, समाधान साठे, परिमल कांबळे, तुकाराम कांबळे, शंकर पाटील,उत्तम लगड, माजी सरपंच अवचार,आदी सह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here