Home नांदेड पंडित दीनदयाळ शिष्यवृत्ती योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा एसएफआय विद्यार्थी संघटनेची...

पंडित दीनदयाळ शिष्यवृत्ती योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा एसएफआय विद्यार्थी संघटनेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

106
0

राजेंद्र पाटील राऊत

पंडित दीनदयाळ शिष्यवृत्ती योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा

एसएफआय विद्यार्थी संघटनेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

मुखेड / प्रतिनिधी संग्राम पाटील तांदळीकर

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ वर्षाची रक्कम आठ दिवसाच्या आत आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी दि २३ फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांच्या मार्फत अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्या कडे एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटी नांदेड च्या वतीने करण्यात आली.

कोरोना , ओमायक्राॅन महामारीमुळे राज्यातील वस्तीगृह, महाविद्यालय विद्यापीठ बंद ठेऊन सरकाराने ऑनलाइन शिक्षण सुरू केले. पण अतिदुर्गम भागात खेड्या , पाड्यात ,वाडी ,तांड्यावर राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांनाचा सरकाराने कोणताही विचार केला नाही.त्यामुळे या दुर्गम भागात मोबाईला इंटरनेट नेटर्वक मिळत नसल्याने हे आदिवासी विद्यार्थी नांदेड सारख्या शहरातच रूम किरायाने घेऊन राहत आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आई वडिल पोटाला पिळ मारून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे पाठवत होते.मात्र आता घरच्या कडून पैसे पाठवले जात नाहीत व शिष्यवृत्ती ही मिळाली नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

सरकार कडून आदिवासी विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ स्वयंम शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो.या शिष्यवृती योजनेच्या आधारावर हे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र सदरिल शिष्यवृतीची रक्कम अध्याप विद्यार्थांना मिळाली नसल्याने विद्यार्थी हतबल होऊन शिक्षण सोडून गावी परत जाण्याच्या मार्गावर आहेत.त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांनी या आदिवासी विद्यार्थ्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून आठ दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या खात्यावर पंडित दिनदयाळ स्वयंम शिष्यवृती योजनेची रक्कम जमा करावी.अन्यथा एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतिने विद्यार्थ्यांना सोभत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे व भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिले आहे.आंदोलन करून न्याय नाही मिळाल्यास एसएफआय च्या वतीने उपोषणाला बसण्यात येईल असे देखील निवेदनात म्हणटले आहे.या निवेदनावर काॅम्रेड पवन जगडमवार , दिनेश येरेकर, संतोष मंत्री , सुमित अंबरबंडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleप्रा.अनिल भेलोंडे यांचे नेट परीक्षेत यश संपादन.
Next articleशालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी हनमंत शिरगिरे यांची बहुमताने निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here