Home परभणी जिंतूरकरांचा “ठेच” हा चित्रपट १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय…

जिंतूरकरांचा “ठेच” हा चित्रपट १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय…

116

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0007.jpg

जिंतूरकरांचा “ठेच” हा चित्रपट १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय…

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

प्रेम मिळवण्यासाठीची धडपड ठेच या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कॉलेजजीवनातल्या प्रेमाची गोष्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी झी म्युझिक कंपनीच्या सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून, १५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
ठेच या चित्रपटात प्रेमत्रिकोण मांडण्यात आला आहे. ग्रामीण भागातल्या कॉलेज जीवनातली फ्रेश गोष्ट या चित्रपटात आहे. अभिनेत्याचा प्रेमासह ध्येय साध्य करण्याचा संघर्षमय प्रवास यामधून उलगडणार आहे नव्या आणि जुन्या दमाचे कलाकार यांची घातलेली सांगड,दमदार कथा, श्रवणीय संगीत आणि उत्तम चित्रीकरण ही चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत. टीजर,ट्रेलरमुळे आणि सुमधुर गाणी आणि जबरदस्त प्रमोशन यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याचा पहिलाच बिग बजेट मोठा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. तुमच्या बुलेट वर बसून फिरवा या गाण्याने आणि गाण्यातील “जगात जर्मनी,भारतात परभणी” या उल्लेखाने गौरव वाढवण्याचा सुंदर कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे .सर्व कलाकार आणि निर्माते,दिग्दर्शक यांनी 15जुलै2022 रोजी सर्वांनी चित्रपट अवश्य बघावा अशी विनंती केली त्याबरोबरच जिंतूर तालुक्यातील प्रेक्षकांना सुविधा म्हणून लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय या ठिकाणी 16 जुलै पासून ठेच हा चित्रपट पाहता येणार आहे.

Previous articleपालम तालुक्यातील 14 गावांचा संपर्क तुटला
Next articleमल्हार हिल कॅम्पसमध्ये अवतरली पंढरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.