Home नाशिक मल्हार हिल कॅम्पसमध्ये अवतरली पंढरी

मल्हार हिल कॅम्पसमध्ये अवतरली पंढरी

148

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0033.jpg

मल्हार हिल कॅम्पसमध्ये अवतरली पंढरी
संदिप गांगुडेॅ/प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलीत मल्हार हिल कँम्पस मधील प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर भाक्षी येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विठ्ठल रखुमाई व वारकऱ्यांच्या वेशात आलेले विद्यार्थी हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर शेवाळे हे होते तर शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा मर्चंट बँकेच्या नवनियुक्त संचालिका कल्पना येवला संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र सोनू कोठावदे शाळा विकास अधिकारी सुरेश येवला किरण सोनवणे आधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई च्या वेशातील विद्यार्थ्यांचे पूजन करण्यात आले. बिंदूशेठ शर्मा कल्पना येवला यांनी विद्यार्थ्यांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडी बरोबरच विविध कार्यक्रम सादर केले गुरुराज जाधव या विद्यार्थ्याच्या माऊली माऊली या गाण्याने सर्वांचे मन जिंकले.
मुख्याध्यापक पंकज दात्रे यांनी प्रास्ताविक सादर केले.
ज्ञानेश्वर सोळूंके, अमोल गातवे, स्वाती दातरे, सारिका शिंदे, स्नेहल वाघ, पवन नाडेकर,सुजाता पाटील, गोकुळ दातरे, शेखर अहिरे ,हर्षली मोरे, सिंधू पवार, जयश्री देवरे,सुजाता गुंजाळ,वृषाली जाधव,दादाजी माळी, रोहिणी सोनवणे, निर्मला रौंदळ, जागृती नहिरे,सविता जाधव, सविता अहिरे,गायत्री देवरे,उषा रौंदल,किरण मोरे,साहेबराव खैरनार, सजन देवरे, किरण पवार,आबा शिंदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.रेखा आहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर कल्याणी गायकवाड यांनी आभार मानले

Previous articleजिंतूरकरांचा “ठेच” हा चित्रपट १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय…
Next articleशारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.