Home नाशिक शारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

शारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0047.jpg

शारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
(जगदिश बधान प्रतिनिधी अजमिर सौंदाणे युवा मराठा न्युज नेटवर्क)काल शनिवार दिनांक ९ जुलै २०२२ रोजी शारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे आषाढी एकादशीची वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ.महेश मगर , मुख्याध्यापिका सौ.रुणाली जाधव यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी पांढऱ्या शुभ्र वारकरी पोशाखात मस्तकी टिळा, विना,पखवाज घालून वारकरी झाले तर विद्यार्थिनींनी डोक्यावर वारकरी संप्रदायाचे प्रतीक तुळस घेतली व नऊवारी साडी परिधान करून आलेल्या होत्या,तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी ची सुंदर वेशभूषा केली होती, आषाढी एकादशी निमित्त अजमिर सौंदाणे गावात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक दिंडीमध्ये सहभागी झाले होते,यावेळी सर्व विद्यार्थी पालकांचे लक्ष वेधून घेत होते,दिंडीनंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक शाळेत आले व कार्यक्रमाच्या शेवटी शाळेत मुलांचे रिंगण करण्यात आले, टाळ मृदुंगच्या गजरात बोला
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”
चा नामघोष करत सर्व विद्यार्थी व शिक्षक त्या रिंगणात सहभागी झाले होते,यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ.महेश गुलाबसिंग मगर सर,शाळेच्या मुख्याध्यापिका सौं रुणाली जाधव ,शिक्षिका प्रणिता सोनवणे,नलिनी बच्छाव,संगीता पाटील,सपना खोंडे, पूजा पवार,पूजा सोनवणे,मनोज पाटील सर,राणी सूर्यवंशी, अश्विनी रौदळ,राधिका पवार,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी , पालक उपस्थित होते.

Previous articleमल्हार हिल कॅम्पसमध्ये अवतरली पंढरी
Next articleवार्ड क्रमांक ४ व ५ मधील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवा – आशिष शेळके.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here