Home नांदेड वार्ड क्रमांक ४ व ५ मधील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवा –...

वार्ड क्रमांक ४ व ५ मधील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवा – आशिष शेळके.

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0016.jpg

वार्ड क्रमांक ४ व ५ मधील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवा – आशिष शेळके.

ग्रामपंचायत सदस्य समस्या सोडवेना, म्हणुन आशिष शेळके सर्व नागरिकांना घेऊन गेले ग्रामपंचायत मध्ये.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
किनवट : शहरातील गोकुंदा ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये अजुनपर्यंत पुष्कळ ठिकाणी पक्की नाली व पक्के रस्ते झालेले नाहीत. त्यामुळे या मुख्य समस्या घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्याध्यक्ष तथा पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी ग्रामसेवकास तक्रार देण्यासाठी सदरील वार्ड मधील सर्व महिला व पुरुषांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गेले. पण गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये तेथील ग्रामसेवक मावळे उपस्थित नसल्याने तेथील कारकुन पवन कोरडवाड जवळ सर्व नागरिकांनी मिळुन लेखी निवेदन देऊन ग्रामसेवकास भ्रमणध्वनीवर सर्व समस्या सांगितल्या.
प्रसार माध्यमांशी बोलताना आशिष शेळके यांनी सांगितले की, वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये, १५ ते २० वर्षांपासून पुष्कळ ठिकाणी पक्की नाली व पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी हे रहिवाशांच्या घरासमोरुन, अंगणातुन तर काही जणांच्या घरात देखील जात आहे, आम्ही या समस्यांचा १५ ते २० वर्षांपासून सामना करत आहोत, वारंवार आमच्या वार्ड मधील सदस्यांना सांगत आलेलो आहोत, तक्रारी करत आलेलो आहोत पण आजपर्यंत कुणीही यांची दखल घेतली नाही. पण आता जर ही समस्या लवकरात लवकर सोडविली नाही तर आम्ही येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत बहिष्कार टाकु आणि जर कुणी मतदान मागण्यांसाठी आले तर त्यांना याच गटाराच्या पाण्याने व चिखलाने माखु अशी चेतावणी आशिष शेळके सोबतच सर्व महिलांनी व नागरीकांनी दिली.
निवेदन देताना पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्या सोबत सदरील वार्ड मधील महिला विमलबाई राठोड, शिवनंदा फड, सावित्रीबाई देवकते, सुलोचना हुरदुके, छाया राऊत, पंचशिला गायकवाड, सुलोचना वाघमारे, सिताबाई हटकर, जयश्री धुर्वे, सारीका उघडे, अनुराधा मिरासे, शेख रुक्साना, शेख रेहाना, सत्यभामा ढगे तर पुरुष धनंजय वाघमारे, पत्रकार दत्ता जायेभाये, रवी वाठोरे, शेख सुलेमान, प्रल्हाद वाठोरे, कपील शेळके, गंगाधर कदम इत्यादी उपस्थित होते.

Previous articleशारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
Next articleसोयाबीन आणि कापूस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत – कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here