Home नांदेड शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस..

शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस..

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0066.jpg

शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस..

मुक्रमाबाद प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद भागात सोयाबीन पिकावर विषाणूजन्य व्हायरसने हल्ला केला आहे. परिणामी सोयाबीनच्या शेंगातील दाना भरण्याच्या आधी सोयाबीनचे धाट (झाड) पिवळे पडत आहे. या व्हायरसवर सध्या तरी कोणतीही उपाय नसल्यामुळे अचानक उद्रेकलेल्या संकटामुळे बळीराजा आज संकटात आहे. मुखेड तालुक्यात सोयाबीन कापूस सर्वाधिक कापूस सोयाबीनचा पेरा झाला आहे. अर्धी पिके अतिवृष्टी मुळे आधीच शेतकऱ्यांच्या हातून गेले होते. परिसरात पेरण्या वेळेवर पार पडल्या होत्या त्या सोयाबीनच्या काही वैशिष्ट्य जातीवर विषाणूजण्य व्हायरसने प्रकार असल्याने तो फवारणी करून सुद्धा रोखता येत नाही. या विषाणू वारलमुळे सोयाबीनचे पीक वेळे आधीच पिवळे पडत आहे.
सोयाबीनच्या शेंगा दाना भरण्याच्या आधीच सोयाबीनची झाडे पिवळे पडत आहेत. शेंगाही जमिनीवर गळून पडत आहेत. झाडाची पाने करपत आहेत त्याचबरोबर सोयाबीनच्या झाडाच्या मुळा चिरत असून त्यात आळ्या पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.प्रारंभी शेतातील काही झाडावर हा रोग पडत. त्यानंतर थोडे थोडे वाढत जाऊन संपूर्ण शिवारातील पिके या रोगाला बळी पडू शकतात. त्यामुळे ज्या सोयाबीनच्या झाडावर विषाणू जुन्या रोग पडल्यास यलो मोझकचे संकट आले असून तेच यलो मोझकचे संकट मुखेड तालुक्यातील सोयाबीन वर आले आहे की काय याची पाहणी तालुका कृषी अधिकारी करणे आवश्यक झाले आहे.असे शेतकरी कडुण ऐकण्यात येते आहे कृषी अधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना सरसकट विमा मंजूर करून देणे असे शेतकरी मंडळी आशा करीत आहेत.

Previous articleआजपर्यंत शिवडी किल्ल्यावर केलेल्या निस्वार्थी कार्याचा सन्मान.
Next articleसोनईत महात्मा गांधी जयंतीनिमित स्वच्छता मोहिम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here