Home पुणे पुणे येथील १० वर्षाच्या छोट्या शिखरवीर स्वरूप शेलारची पतालसू शिखरावर चढाई. हडपसर...

पुणे येथील १० वर्षाच्या छोट्या शिखरवीर स्वरूप शेलारची पतालसू शिखरावर चढाई. हडपसर (पुणे)

158
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे येथील १० वर्षाच्या छोट्या शिखरवीर स्वरूप शेलारची पतालसू शिखरावर चढाई.

हडपसर (पुणे)

प्रतिनिधि :- स्वप्निल देशमुख बूलडाणा

मांजरी, हडपसर पुणे येथील व्हिनस वर्ल्ड स्कूल मध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या स्वरूप शेलार या अवघ्या १० वर्षे वय असलेल्या चिमुकल्या गियोरोहकाने मनाली(हिमाचल प्रदेश) येथील पिर प्रांजल पर्वत रांगेतील पतालसू व फ्रेंडशिप ही दोन्ही शिखरे एकाच मोहिमेत सर करण्याचा विक्रम केला आहे.
स्वरुपला लहान वयात ट्रेकिंगचा छंद जडला होता.वडकीमार्गे पुरंदर तालुक्यातील कानिफनाथ गडावरील पहिली चढाई त्याने वयाच्या पाचव्या वर्षी केली, त्यातूनच त्याला डोंगर दऱ्यांची माहिती जमवून अभ्यास करण्याचा ध्यास लागला. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर त्याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी सर केले,त्याच्या या कामगिरीने लहान वयाचा गिर्यारोहक म्हणून त्याची ओळख झाली.स्वरुपला क्रीडा शिक्षक असलेल्या आई नीलम शेलार व खाजगी कंपनीत नोकरी करत असलेले वडील प्रवीण शेलार यांच्याकडून त्याला लहानपणापासून बाळकडू मिळत होते, तसेच आजी पोलिस निरीक्षक द्वारका डोखे यांच्याकडून त्याला ट्रेकिंगची प्रेरणा मिळाली.
ड्रीम अँडव्हेंचर संस्थेने पतालसू ,फ्रेंडशिप आणि माऊंटन शितीधर या शिखरांची मोहीम आयोजित केली होती.या मोहिमेत एकूण १६ सदस्यांनी सहभाग घेतला होता व त्याचे नेतृत्व महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले एव्हरेस्टवीर रफिक शेख यांनी केले,या मोहिमेत छोटा स्वरूपही सहभागी झाला होता.
सदर मोहिमेसाठी उद्योजक श्री.दशरथ जाधव, व्हिनस वर्ल्ड स्कूलचे संचालक श्री.माधव राऊत, प्राचार्या सौ मृण्मयी वैद्य, पोलिस हवालदार ब्रम्हादेव मेटे, गणेश पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
मला आई वडील व आजीकडून लहानपणापासून डोंगरदऱ्यात भटकंती करायला मिळाली, त्यातून ट्रेकिंगचा छंद जडला. आफ्रिकेतील किली मांजरो आणि एव्हरेस्टचा बेल कॅप सर करण्याचे पुढचे ध्येय छोट्या शिखरवीर स्वरुप समोर आहे आणि गिर्यारोहणांमध्ये कॅरियर करुन आपल्या भारत देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न छोट्या स्वरुपने केला आहे.
छोट्या शिखरवीर स्वरुपला युवा मराठा न्यूज टीम कडून पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा.

Previous articleजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी
Next articleकोरोना ओमायकाॅन संसर्गमुक्तीच्या प्रार्थनेसाठी अजमेरला सायकल ने प्रवास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here