Home विदर्भ एस.टि.आर.सी.मार्फत एक दिवसीय सगूना भात लागवड कार्यशाळा। विज्ञान व तंञज्ञान संसाधण केंद्र...

एस.टि.आर.सी.मार्फत एक दिवसीय सगूना भात लागवड कार्यशाळा। विज्ञान व तंञज्ञान संसाधण केंद्र ,गोंडवाना विद्यांपीठ गडचिरोली येथे संपन्न।

79
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211217-WA0054.jpg

एस.टि.आर.सी.मार्फत एक दिवसीय सगूना भात लागवड कार्यशाळा।
विज्ञान व तंञज्ञान संसाधण केंद्र ,गोंडवाना विद्यांपीठ गडचिरोली येथे संपन्न।
गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-:विज्ञान व तंञज्ञान संसाधण केंद्र (एस.टि.आर.सी.)ही गडचिरोली च्या गोंडवाना विध्यापीठात स्थित स्वायत्त संस्था असुन योग्य विज्ञान आणी तंञज्ञानाचा वापर करून उपजिविकेच्या संधी निर्माण करण्याचे काम गडचिरोली जिल्हात करत आहेत. एस.टि आर.सी.केंद्र 2014 पासुन गडचिरोली भागातील समुदायांसाठी शाश्वत मूल्य निर्मितीकरिता उत्क्रष्टतेचे केंद्र म्हणुन स्थांनिक संसाधणे ,संबधित ज्ञान सक्षम विकासासाठी योग्य तंञज्ञानाचा लाभ देत आहे. एस.टि.आर.सी.या प्रदेशाच्या विज्ञान आणी तंञज्ञानावर आधारीत विकासासाठी उत्प्रेरक म्हणुन आणी विद्यापिठाच्या ज्ञान क्रियाकलपांमधिल सेतु म्हणुन कार्य करत आहे.
जिल्हातील शेतकर्यांकरिता शाश्वत उपजिविके अंतर्गत “सगुना भात लागवड तंञज्ञानातून धान उत्पादकता वाढ” या विषयावर एस.टी.आर.सी. मार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.सदर कार्यशाळेकरिता ता.मावळ (पुणे) येथे कार्यरत असलेले एस.आर.टी विषयी विषय तज्ञ व क्रूषी पर्यवेक्षक श्री.नविनचंद्र बोर्हाडे एस.आर. टि.सेवक (सातारा जिल्हा) श्री योगेश बन्सोड आणी एस.आर.टी सेवक (गडचिरोली जिल्हा) श्री राजेश वाणी यांनी उपस्थित शेतकर्यांना तंञज्ञानाचे वापर,फायदे,व उध्दभवनार्या समस्या या विषयावर मार्गदर्शन केले.एस.टि.आर.सी.चे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख श्री.आशीस घराई यांनी शेतकर्यांनी शेतीमध्ये उत्पनं वाढिसाठी योग्य तंञज्ञानाचा वापर करावा तसेच एस.टि.आर.सी.निर्मित कमी खर्चाचे तंञज्ञान, पध्दती व साधनाचा मोफत लाभ घ्यावा अशी आवाहण करीत कार्यशाळेची सुरुवात केली.श्री.नविनचंद्र बोर्हाडे,व श्री योगेश बन्सोड यांनी शेतकर्यांनां एस.आर.टी पध्दतीचे तांञीक माहीती,लागवड व त्यांचे फायदे यावर मार्गदर्शन करित उपस्थितांच्या समस्याचे योग्य निराकरण केले.शेतकर्यांनी सुध्दा कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत धान व ईतर पिंकाचे उत्पादन काढिकरीता या तंञज्ञान वापर करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमामध्ये एस.टि.आर.सी.ने संशोधन आणि विकासाच्या माध्यमातुन बांबू पासुन तयार केलेल्या टोकन यंञाचे प्रत्याक्षिक शेतकर्यांना देण्यात आले.एस.टि.आर.सी.उपलब्ध तंञज्ञान आणी स्वनिमित तंञज्ञानाचे स्थानिक गरजांनुसार सानूकुलीत तंञज्ञान व पध्दती ची निर्मिती करण्यास कंटिबध्द आहे,गडचिरोली जिल्हाच्या संदभात अशा तंञज्ञानाचा व पध्दती चे सुरडित हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी एसटिआरसी तंञज्ञान सुविधाकत्याची भुमिका बजावत आहे.

Previous articleपरत मागे फिरा मंत्री यड्रावकर मिनचेकरांना मुरलीधर जाधव यांचे आवाहन.
Next articleबंगळूरात शिवप्रेमी आक्रमक : पुन्हा एकदा महाराष्ट्र – कर्नाटकात वाद चिघळण्याची शक्यता..?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here