Home कोल्हापूर नोकरीच्या मागे न लागता शेतीतून साधली समृद्धी

नोकरीच्या मागे न लागता शेतीतून साधली समृद्धी

108
0

राजेंद्र पाटील राऊत

नोकरीच्या मागे न लागता शेतीतून साधली समृद्धी

 

पाडळी : (ता.हातकणंगले) येथील नितीन राजाराम पाटील या युवकाचे वडिलांचे छत्र हरपल्यानंतर खाजगी कंपनीतील नोकरी सोडून शेतीसह जनावरांचे संगोपनावर लक्ष केंद्रित केले. जनावरांपासून लाखोंची कमाई तर २५ गुंट्यात ७० टन ऊसाचे उत्पादन निघाल्याने शेती व्यवसायातही युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
पाडळी येथील नितीन राजाराम पाटील याच्या वडिलांचे तीन वर्षापूर्वी यांचे निधन झाले. आशा वेळी वडिलांचे छत्र हरवले होते काय करायचे हा प्रश्न होता यामुळे नितीनने शिरोली येथील औद्योगिक वसाहतीतील खाजगी कंपनीतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व गावात नितीनने कशाला नोकरी सोडली ? याची चर्चा चांगलीच रंगली. पण नितिनने वडिलार्जित अडीच एकर शेतीवर लक्ष केंद्रित करून सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला. त्याचबरोबर वासरे संगोपनावर भर दिला. गायी तयार झाल्यानंतर त्याने आतपर्यंत पाच गायींची विक्री सुमारे सत्तर हजारांहून अधिक किमतीने विक्री केली. तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी हरीयाना राज्यातून नितीनने पंधरा हजार रुपये प्रमाणे म्हेहसाना जातीच्या रेड्या आणल्या. त्यांचे संगोपन सुरू केले असून काही वर्षभराने त्या लाखांहून अधिक किमतीने विक्री होणार याची त्याला खात्री आहे.
गतवर्षी त्याने २५ गुंटे क्षेत्रात ८६०३२ ऊस बियाण्याची लागवड केली. मशागत, शेणखत, ठिबकद्वारे विविध प्रकारच्या फवारणी , आंतरमशागत वेळेत केल्याने १७ महिन्याने ऊसाचे गाळप झाले. ऊसाला ४८ ते ५२ दरम्यान पेरी झाली. यामुळे ७० टन ऊसाचे उत्पादन निघाले. सुमारे ५० हजार खर्च आला तर २ लाख १ ७ लाखांचे उत्पादन निघाले. कमी खर्चात जास्त नफा झाला.
शेतीवर लक्ष केंद्रीत केलेल्या नितीनने पारंपरिक पद्धतीने जनावरांचे संगोपन न करता
लहान रेडी, वासरे खरेदी करायची आणि मोठी जनावरे झाल्यावर विक्री करायची निर्णय घेतला.
स्वतः ची शेती करीत जनावरांचे संगोपन करणे अवघड नाही. मात्र आधुनिक पध्दतीने शेती आणि जनावरांची देखभाल करीत असल्याने लाखो रुपयांचा नफा नफा मिळतो. नोकरी केली असती तर शेतीकडे दुर्लक्ष झाले असतेच पण आर्थिक प्रगती झाली नसती. असेही नितीनने सांगितले.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here