राजेंद्र पाटील राऊत
नायगाव सिटी दातांच्या दवाखान्या तर्फे तीन दिवसीय मोफत दंत तपासणी शिबिर.
————————————–
नायगाव प्रतिनिधी : निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)
नायगाव यथे सिटी दातांच्या दवाखान्या अंतर्गत दि. २५/२५/ व २६ नोव्हेंबर २०२१ रोजी तीन दिवसीय मोफत दंत व मुख आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी गरजूंना रूग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.राहुल राजेंद्र पांचाळ व डॉ.सौ.अश्विनी राहुल पांचाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे
दातांच्या विविध आजारावर रूग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळावे म्हणून दातांच्या विविध उपचारासाठी नायगाव शहरात नायगाव सिटी दातांच्या दवाखान्या अंतर्गत तीन दिवसीय मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराचे वेळ सकाळी १०:०० ते दुपारी ०५:०० वाजेपर्यंत राहणार असून डा.राजेंद्र पांचाळ(दंत शल्यचिकित्सक घाटी रुग्णालय) व डॉ.सौ.अश्विनी पांचाळ(दंत व मुख रोग तज्ञ) हे रूग्णांची तपासणी करणार आहे शिबिरासाठी नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी मो.९१७५७०८०७९ क्रमांकावर संपर्क साधावा नोंदणी फिस दहा रुपये आहे शिबिराचे स्थळ नायगाव सिटी दातांचा दवाखाना मेडेवार कॉम्प्लेक्स इण्डेंण गॅसच्या बाजूला हेडगेवार चौक नायगाव (बा.) शिबिरामध्ये उपलब्ध सुविधा मोफत डिजिटल एक्सरे व औषधी वाटप करण्यात येणार असून जास्तीत जास्त रूग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.श्री व सौ.पांचाळ यांनी केले आहे.