राजेंद्र पाटील राऊत
देगलूर बिलोली चे नवनिर्वाचित आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे शपथविधीनंतर थेट शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी सरसावले. (संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर)-देगलूर बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा मंजूर करून द्यावा. या मागणीचे निवेदन या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. व मा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी बिलोली व देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा मदत, मंजूर करण्याचे आश्वासन आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना देण्यात आले आहेत. देगलूर तालुक्यातील 19 गावासाठी 6842- 58732 क्षेत्राला 13 कोटी 85 लाख 64 हजार 47 रुपये रक्कम 8 हजार443 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार 250 रुपये प्रमाणे विमा मंजूर आहे. तर देगलूर तालुक्यातील 101 गावाला 29704 -58827 क्षेत्राला 21 कोटी 38 लाख 73 हजार27 रुपये रक्कम 33हजार 949 शेतकर्यांना प्रति हेक्टरी 7 हजार 200 रुपये प्रमाणे मंजूर आहेत. बिलोली तालुक्यातील 12 गावासाठी 5818-45697 क्षेत्राला 12कोटी 09 लाख 66 हजार 147 रुपये रक्कम 7 हजार 866 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार790 रुपयेप्रमाणे विमा मंजूर आहे. तर बिलोली तालुक्यातीलच 81 गावाला 25 832 73 81 क्षेत्राला 20 कोटी 92 लाख 45हजार 218 रुपये रक्कम 34 हजार 619 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8 हजार 100 रुपये प्रमाणे मंजूर आहेत. शेतकरी बांधवांच्या सध्या खात्यावर जमा झालेली रक्कम ही 73% जमा झाली असून 27% ही रक्कम शासनाची सबसिडी जमा झाल्यानंतर दुसरा हप्ता वितरित होणार, असल्याचे विमा कंपनीकडून व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सांगण्यात आले.
व याबाबत मा.पालकमंत्री महोदय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब व कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवळे, कृषी आयुक्त धीरजकुमार विमा कंपनीचे अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक लावणार असल्याचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी सांगितले.