Home नांदेड पिक विमा इपको, टोकिओ या कंपनीने केली शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक

पिक विमा इपको, टोकिओ या कंपनीने केली शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक

213
0

राजेंद्र पाटील राऊत

पिक विमा इपको, टोकिओ या कंपनीने केली शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक                                                           ( संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) -देगलूर बिलोली या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक पिक विमा मिळणार, असे सांगत होते. पण या इफको, टोकियो या पिक विमा कंपनीने या तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीनचे हेक्‍टरी 1200,ते 1300 रुपये देऊन एक प्रकारची चेष्टाच करण्यात आली आहे. या तालुक्यातील पोटनिवडणुकीच्या दरम्यान मोठ- मोठ्या नेत्यांची सभा झाली होती, व मोठ-मोठी आश्वासने नेते मंडळी देऊन गेले. पिक विमा नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक जास्त देगलूर-बिलोली तालुक्यात मिळणार असे जाहीर सभेत सांगत होती. पण मागच्या तीन ते चार दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होत असून, जमा होणारी रक्कम पाहिले तर हेक्टरी बाराशे ते तेराशे रुपये जमा होत आहेत. शासन व पिक विमा कंपनीने शेतकऱ्याची एक प्रकारची थट्टाच करते की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात राग व संताप निर्माण होऊ लागला आहे. इफको,टोकियो या कंपनीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे करत असल्यामुळे, या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा 420 दाखल करावा. अशी मागणी प्रहार जनशक्ती चे तालुका अध्यक्ष व शेतकऱ्यांचे नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी मा. जिल्हाधिकारी विपिन इटणकर साहेब नांदेड यांना निवेदन देण्यात आले आहे .जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक करून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असे सांगण्यात आले आहे. या कंपनीचा आम्ही जाहीर निषेध करतो. व राज्य सरकार केंद्र सरकारवर ढकलते, केंद्र सरकार राज्य सरकारला सांगते. या सरकारचाहि आम्ही जाहीर निषेध करतो, असे या वेळी बोलण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here