Home कोकण लांजात संकल्पग्रुपचा अनोखा दीपोत्सव : सलग १७ व्या वर्षी आयोजन.. 🛑

लांजात संकल्पग्रुपचा अनोखा दीपोत्सव : सलग १७ व्या वर्षी आयोजन.. 🛑

75
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 लांजात संकल्पग्रुपचा अनोखा दीपोत्सव : सलग १७ व्या वर्षी आयोजन.. 🛑
✍️ लांजा : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी/लांजा :-⭕संकल्प ग्रुप लांजाच्यावतीने सलग 17 वर्षी दीपोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

सुरुवातीला संकल्प ग्रुपच्यावतीने प्रबोधनपर विषयावर देखावे सादर करून लांजा शहरात दीपोत्सवाचे आयोजन केले जात असे. त्यानंतर संकल्प ग्रुपने सामाजिक प्रबोधनपर विषय घेऊन ही परंपरा आजतागायत सुरू ठेवली आहे. २००७ नंतर संकल्प ग्रुपचे सदस्य सिद्धराज उर्फ आबा कुरूप यांच्या संकल्पनेतुन दीपोत्सव साजरा केला जातो.

लांजा येथील परिसरातील विविध धार्मिक स्थळांना ग्रुपच्या सदस्यांनी भेट देऊन हा दीपोत्सव उत्साहात साजरा केला. यावर्षी दीपोत्सवाचे हे सलग 17 वे वर्ष आहे. श्री केदारलिंग मंदिर, दत्त मंदीर, सिध्दभैरी, जाकादेवी, पाचाचा मांड, श्री भगवती, श्री जुगाईदेवी, श्री पौलस्थेश्वर, कलावती आई, विठ्ठलादेवी, साई मंदिर, जुगाई, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, रोहिदास वाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पुरातन स्वामी मठ, श्री बसवेश्वर चौक, हजरत चांद शहा बुखारी दर्गा, श्री चव्हाटा या मंदिरांमध्ये दीप प्रज्वलन करण्यात आले. श्री चव्हाटा मंदिर येथे या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

दीपोत्सवाचे आयोजन करण्यात मंगेश उर्फ पपू मुळे, सचिन लिंगायत, प्रल्हाद साळुंखे, निलेश डांगे, नंदराज कुरूप, पांडुरंग कुरूप, सिद्धराज कुरूप, विघ्नेश कुरूप, सुरज लोध, वैभव नागवेकर, विशाल कांबळे, प्रकाश हर्चेकर, पपू जुवेकर, पिंटू जुवेकर, संतोष हर्चेकर, सोन्या रेगुडकर, संकल्प साळुंखे, नागेश कुरूप, किरण गुरव, विवेक कनावजे, विनोद बेनकर, दुर्वा राणे, आदित्य कांबळे, अमेय कांबळे, संदीप सावंत, अजय सावंत, सचिन कोळवणकर, आशुतोष शिंदे,साई जुवेकर,दिनेश खेडेकर, आदर्श साळुंखे, करण साळुंखे, सुमित साळुंखे, शुभम शेट्ये , साई शेट्ये, प्रसाद जठार, राजा बेडखळे, अनिकेत शेट्ये, अतुल गुरव, फैयाज मुजावर, गुल्या नेवरेकर, गौरव शेट्ये, मंदार सावंत, सागर मांडवकर, दिनेश पवार, श्वेता साळवी, मंजिरी कुष्टे, सायली वाघधरे, वैशाली मुळे, पूर्वा मुळे, स्वरा मुळे, राज चव्हाण, अदनान मुजावर, स्वप्नाली साळवी, डॉली वाघधरे, सायली पराडकर, निकिता कुरूप, मानसी कुरूप, निकिता चाफोळकर, संदीप बेनकर, हृषीकेश साळवी, रोहित पाटील, तुषार जाधव, प्रसाद चव्हाण, मोहित पाटील, अनिल कांबळे, देवेंद्र उर्फ बाबू वाघधरे, प्रवीण चाफोळकर, सतीश बरदे, स्वरूप शेट्ये , तुषार लांजेकर, आदींनी मेहनत घेतली.⭕

Previous articleरुपालीताई चाकणकर महाविकास आघाडी व पुणे शहराच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
Next articleभाजपला धक्का : जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंची अखेर बिनविरोध निवड 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here