Home उतर महाराष्ट्र भाजपला धक्का : जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंची अखेर बिनविरोध निवड 🛑

भाजपला धक्का : जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंची अखेर बिनविरोध निवड 🛑

95
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑भाजपला धक्का : जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंची अखेर बिनविरोध निवड 🛑
✍️ जळगाव : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव :⭕ जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे, त्यामुळे एकनाथ खडसे यांची जळगाव जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली आहे.

भारतीय जनता पक्षाला हा धक्का मानला जात आहे.जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून एकनाथ खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात नाना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.

भुसावळ येथील एका पतसंस्थेचे कर्ज थकीत असल्याने नाना पाटील यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला होता, त्या विरोधात पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील केले होते. ते अपील फेटाळून लावण्यात आले आहे.

एकनाथ खडसे यांच्यासोबत इतर गटातील आठ उमेदवारांचे अर्जही फेटाळण्यात आले होते. त्याविरुध्द पाटील व इतर आठ उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज (ता. ५ नोव्हेंबर) सुनावणी होऊन सर्वांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत.

यामुळे मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून खडसे यांच्या विरोधात असलेला एकमेव अर्ज फेटाळला असल्याने खडसे यांची जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेवर बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच खडसे यांच्या बिनविरोध निवडीला आव्हान देणारा अर्ज न्यायालयाने फेटाळूल लावण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.⭕

Previous articleलांजात संकल्पग्रुपचा अनोखा दीपोत्सव : सलग १७ व्या वर्षी आयोजन.. 🛑
Next articleखेड सातारा येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सातारा टिमची बैठक पार पडली 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here