Home उतर महाराष्ट्र अहमदनगर भीषण अग्निकांडात १० जणांचा होरपळून मृत्यू प्रकरणी: तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, तीन...

अहमदनगर भीषण अग्निकांडात १० जणांचा होरपळून मृत्यू प्रकरणी: तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, तीन परिचारिकांची सेवा समाप्त….तात्काळ निलंबित

85
0

राजेंद्र पाटील राऊत

अहमदनगर भीषण अग्निकांडात १० जणांचा होरपळून मृत्यू प्रकरणी: तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, तीन परिचारिकांची सेवा समाप्त….तात्काळ निलंबित

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
अहमदनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णलयातील अतिदक्षता विभागात घडलेल्या भीषण अग्निकांडात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आणि काहीजण जखमी देखील झाले. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते, अशी देखील माहिती समोर आली होती. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली गेली. तर, या घटनेवरून विरोधकांकडून राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणावर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आणि आता या दुर्घटनेप्रकरणी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन परिचारिकांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वार याबात माहिती दिली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. १. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित २. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित ३. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित ४. सपना पठारे- स्टाफ नर्स – निलंबित ५. आस्मा शेख – स्टाफ नर्स – सेवा समाप्त ६. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त.” अशी माहिती ट्विटद्वारे आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेली आहे.
आरोग्य विभागाने जून २०२१ मध्येच आग लागलेल्या नवीन इमारतीसाठी आग सुरक्षा प्रतिबंधक सुविधांच्या खर्चासाठी २ कोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठवले होते. मात्र पाठपुरावा करूनही अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही, असे सांगत टोपे यांनी राज्यातील सुमारे ५५० सरकारी रुग्णालयांच्या आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.
आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज ; राजेश टोपे यांचा बांधकाम विभागावर ठपका
तर, आगीच्या दुर्घटनेचा नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीला सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिल्याचे व अहवालात जे दोषी असतील त्या सर्वावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here