Home मराठवाडा समायोजित सुट्ट्या दिवाळी सुट्टीला जोडून किंवा कसे? उद्या पर्यंत निर्णय!     ...

समायोजित सुट्ट्या दिवाळी सुट्टीला जोडून किंवा कसे? उद्या पर्यंत निर्णय!                               

200
0

राजेंद्र पाटील राऊत

समायोजित सुट्ट्या दिवाळी सुट्टीला जोडून किंवा कसे? उद्या पर्यंत निर्णय!                                                       औरंगाबाद (बबन निकम ब्युरो चीफ औरंगाबाद युवा मराठा न्यूज वेब चैनल )

शिक्षक सेनेच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार!
_________________________
_महिला सरपंच परिषदेदरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष दीपक दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व मा.शिक्षण सभापती साहेब यांची एकत्रित भेट घेऊन समायोजित सुट्ट्या लगेच दिवाळी सुट्टीलाच जोडून घेण्याबाबत सविस्तर चर्चा केली._
_बहुतांश विद्यार्थी दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी नातेवाईकांकडे गेलेले असतात, तसेच दीड वर्षानंतर अनेक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या कोरोना काळातील विविध जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत असल्याने मूळ गावी गेलेले नव्हते, असे बहुतांशी शिक्षक आपल्या मूळगावी गेलेले असल्याने तसेच अनेक महिला शिक्षिका भाऊबीज निमित्त बर्र्‍याच दिवसांनी माहेरी गेलेल्या असल्याने भविष्यात कधी ना कधी घ्यावयाची समायोजित सुट्टी या दिवाळी सुटीला जोडून घेतल्यास सर्वांच्याच हिताचे होईल, ही भूमिका शिक्षक सेनेच्या वतीने दोन्ही अधिकारी-पदाधिकाऱ्यांना शिक्षक सेनेने पटवून दिल्याने दोघांनीही अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे सूतोवाच केले असून याबाबत आज सायंकाळपर्यंत किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याबाबत आश्वासित केले आहे._
_यावेळी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळात जिल्हा संपर्कप्रमुख तथा जि.प.निमंत्रित सदस्य प्रभाकर पवार ,जिल्हाध्यक्ष दीपकदादा पवार , जिल्हा कार्याध्यक्ष भगवानराव हिवाळे, पैठण तालुकाप्रमुख अमोलराजे एरंडे, उपाध्यक्ष विजय अंबेकर, सचिनराव वाघ आदी पदाधिकारी चर्चेसाठी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here