Home माझं गाव माझं गा-हाणं आदिवासी एकता मित्र मंडळ मनोर ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च व...

आदिवासी एकता मित्र मंडळ मनोर ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च व ठिय्या आंदोलन

316

राजेंद्र पाटील राऊत

आदिवासी एकता मित्र मंडळ
मनोर ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च व ठिय्या आंदोलन                                                                पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज)
पालघर आदिवासी जिल्हा असला तरी आदिवासी समाजाचे हाल जिल्ह्यामध्ये अत्यंत बिकट आणि दयनीय आहेत या समाजावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाजाचे नेते आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे तसेच मंडळाचे विश्वस्त दामोदर कासट,मंगेश गोंड,योगेश भुयाळ व सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या नियोजनात आज दि 8 नोव्हेंबर 2021 रोजी लाँग मार्च व ठिय्या आंदोलन मनोर पासून ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला प्रमुख 12 मागण्यांसाठी जिल्ह्यातील वन मजूर,मलेरिया कामगार व काटेलपाडा ग्रामस्थ यांचा रस्त्याचा प्रश्न या विषयावरून मोर्चाचे स्वरूप ठरले होते.शासकीय दबाव तंत्राचा वापर करत पोलिस प्रशासना मार्फत आंदोलन थांबवण्याचा अतोनात प्रयत्न केला गेला पण संतोष जनाठे यांच्या मार्गदर्शना खाली असलेल्या सर्व आदिवासी पीडित महिला व समाज यांचा आक्रोश बॅरिकेट व दोर तोडत पुढे निघाला, लाँग मार्च पायी चालत मनोर पासून निघाला आणि पुढील नेटाळी या स्टॉप वर चहा पाण्यासाठी थांबा करण्यात आला पण पोलिसांन मार्फत कळवण्यात आले की प्रलंबित प्रश्न असलेल्या त्या त्या खात्याचे शासकीय अधिकारी मागण्या ऐकण्यासाठी येत आहेत तरी तासभर सर्वाना थांबवल्या नंतर सर्व शासकीय अधिकारी उपस्थित झाले सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मातीत जन्मलेल्या संतोषजी जनाठे यांनी शासनाच्या प्रतिनिधींना मातीवर बसवून चर्चा करण्यास भाग पाडले.आपला पाठिंबा देत ठाण्याचे भाजप मा आमदार संजय केळकर ,भाजपा पालघर जिल्हाअध्यक्ष नंदकुमार पाटील* ,मा.बापजी काठोले,मा.हरिश्चंद्र भोये,मा.हेमांतजी सवरा,मा. सुरेखा ताई थेतले, मा.सुशील औसरकरमा.ज्योतिताई भोये, उपस्थित होते.चर्चा करून पुढील मागण्या येत्या महिन्या भराच्या आत पूर्ण करू असे फक्त आश्वासन नाही तर लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आले ,आंदोलन यशस्वी करत तात्पुरता स्थगित करण्यात आले व महिन्या भरात जर हे प्रश्न मार्गी लागले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आदिवासी एकता मित्र मंडळातर्फे करण्यात आला.

Previous articleसमायोजित सुट्ट्या दिवाळी सुट्टीला जोडून किंवा कसे? उद्या पर्यंत निर्णय!                               
Next articleपालघर खासदारां कडून श्रीधर रमेश चामरे ह्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.