Home महाराष्ट्र महावितरण कंपनीचा बोगस कारभार..! ५००० कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात, बोनस राहिला पगार...

महावितरण कंपनीचा बोगस कारभार..! ५००० कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात, बोनस राहिला पगार सुधा नाही

89
0

राजेंद्र पाटील राऊत

महावितरण कंपनीचा बोगस कारभार..! ५००० कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात, बोनस राहिला पगार सुधा नाही

ठाणे ( अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार जवळपास ५००० लोक काम करतात,परंतु स्वतची पोळी भाजून घेण्यात उर्जा मंत्री नितीन राऊत, सोबतच महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक,अधिकारी व्यस्त असतात, याची प्रचिती वारंवार येत आहे.

कंत्राटी कामगारांना मुळात पगार फक्त १४००० असतो,त्यात कॉन्ट्रॅक्टर हा महावितरण कंपनीचा जावई असल्यासारखं प्रतेक महिन्याच्या १५ तारखेला कंत्राटी कामगारांचे पगार करत असतो, मग ह्या दिवाळीला महावितरण कंपनीक्या अधिकाऱ्यांना स्वतः पुरता १२००० आणि ७२०० बोनस उर्जा मंत्री नितीन राऊत कडून मान्य करून घेताना लाज कशी वाटली नाही.

कामगार आयुक्तबृहन्मुंबई यांचे कामगारांचे पगार १० तारखेला करण्याचे आदेश असताना प्रत्येक महिन्याला कॉन्ट्रॅक्टर पगार १० च्या आधी कधीच करत नाही,पी एफ वेळेवर भरत नाही, कामगार आयुक्तांच्या आदेशाला महावितरण कंपनीचे अधिकारी केराची टोपली दाखवतात तर उर्जा मंत्री आपण फक्त विदेशी दौरे करण्यासाठी मंत्री आहात का? दिवाळीच्या तोंडावर कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उर्जा मंत्री काय करतात कायमस्वरूपी महावितरण अधिकाऱ्यांना १२००० बोनस जाहीर करतात,दुसरीकडे ५००० कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात जाताना दिसत नाही का?

आज पर्यंत कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक कंत्राटी कामगारांची आंदोलन निदर्शनं झाली. परंतु जाब विचारायला पत्र व्यवहार केला असता, वरिष्ठांकडून विचारणा केली असता, महावितरण कंपनीचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर वर जबाबदारी सांगतात मग महावितरण कंपनीवर व्यवस्थापकीय संचालक,उर्जा मंत्री, हे चालवतात की प्रतेक महिन्याला नवीन येणार कॉन्ट्रॅक्टर चालवतात हे समजत नाही.

गेल्या २०१८ ला फक्त ८००० पगार कंत्राटी कामगारांना होता तो आंदोलन करून कामगार मंत्री,उर्जा मंत्री यांना भेटून आता३ वर्षात १४००० लिपिक,१२५०० शिपाई झाला आहे,तो देखील याना देसण्यास जीवावर येतं असेल ,आणि महावितरण कंपनी वीज बिल भरले नाही उशीर झाला तर सरळ वीज खंडित करते, मग ५००० लोकांचे पगार दिवाळीत न करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर वर ,असे असताना उर्जा मंत्री अजूनही असेच डोळे झाकून बसणार आहेत का? की काही कंपनी अधिकारी, कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टवर काही कारवाई करणार या कडे सर्व महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांचे संघटनाचे लक्ष्य लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here