Home नांदेड बहादरपुरा येथे शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख वाचन कट्ट्याचे उद्घाटन संपन्न

बहादरपुरा येथे शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख वाचन कट्ट्याचे उद्घाटन संपन्न

162
0

राजेंद्र पाटील राऊत

बहादरपुरा येथे शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख वाचन कट्ट्याचे उद्घाटन संपन्न

 

नांदेड ब्युरो चीफ / राजेश भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

 

मन्याड खोर्‍यातील बहाद्दरपुरा म्हणटले की आठवते राजकिय चळवळीची नगरी.डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या कार्याने प्रसिद्धीस आलेले ग्राम. आज बलिप्रतिपदेस भाई दत्तात्रयराव कुरुडे यांनी 33 वर्षापुर्वी स्थापन केलेल्या कै.ऊल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालय बहाद्दरपुरा ता.कंधार या ब दर्जाच्या ग्रंथालयाने ज्येष्ठ नागरीक, सेवानिवृत्त कर्मचरी अन् दिव्यांग बंधु-भगिना वाचनाची भुक भागविण्यास नांदेड जिल्ह्यातील पहिला दिवंगत भाई गणपतराव देशमुख वाचन कट्ट्याचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतापराव सूर्यवंशी यांच्या समर्थ हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष व नांदेड जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी भुषविले.प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे, द.भ.प. दत्तगीर गुरु आनंदगीर महाराज, नुकतेच डेप्युटी कलेक्टर म्हणून पदोन्नती मिळलेले अधिकारी प्रशांत रुमाले, बहाद्दरपुरा नगरीचे सरपंच सौ.गोदावरीबाई गायकवाड, उपसरपंच हणमंतराव पेठकर,प्रकाशराव कुरुडे, माजी सरपंच माधवराव पेठकर, माजी उप सरपंच दिगंबरराव पा. पेठकर,माजी उपसरपंच भाई गुरुनाथराव पेठकर व उत्तमराव भांगे,  माजी सरपंच बाबुराव ऐनवाड, माजी उपसरपंच भाई पंडितराव पेठकर प्रा.वैजनाथराव कुरुडे, सुधीर कुरुडे, आदर्श मुख्याध्यापक रुमाले गुरुजी, आजी-माजी माजी ग्राम पंचायत सदस्य व आदर्श वाचक शिवराज पेठकर व किरण ढगे या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेस वंदन वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने होवून दिवंगत साहित्यिक, देशाच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाचे मार्गदर्शनपर प्रास्तविक माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी केले.तर उद्घाटक प्रतापराव सूर्यवंशी यांनी या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती जतन करण्यासाठी हा वाचन कट्टा महत्वाचा ठरणार आहे.तरुण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवता यावे या स्पर्धा परीक्षेस लागाणारे ग्रंथ वा नियतकालिके ग्रंथालयाने या वाचन कट्ट्यावर उपलब्ध करुन द्यावे अशी सुचना या उद्घाटन प्रसंगी सुचवतो.जिल्हा नव्हेतर राज्यभर अशा वाचन कट्ट्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.माजी उपसरपंच दिगंबरराव पा.पेठकर यांनीही विचार मांडले.अध्यक्षीय समारोप करतांना युवानेते व अध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार

यांनी समारोप प्रसंगी भाई दत्तात्रयराव कुरुडे बंधुंचे अभिनंदन करतो.त्यांनी आपल्या छोट्या भावाची स्मृती सदा राहावी यासाठी कै.ऊल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालय गावात सुरू केले.त्या गंथालया अंतर्गत दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नावे वाचन कट्टा निर्माण करुन वाचनाची गोडी तरुणांना व्हावी या साठी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल.

कार्यक्रमास गावातील शिक्षण प्रेमी,ज्येष्ठ नागरीक बहुसंखने उपस्थित होते

या प्रसंगी पत्रकार डाॅ.प्रा.गंगाधर तोगरे, अॅड.हफिजभाई घडीवाला, राजेश्वर कांबळे,सिकंदर भाई, दत्तात्रयराव धोंडगे सर,परसराम धोंडगे, साहेबराव सिनगारे,युसुफ शेख,कै.ऊल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार यांच्या शाखेतील कर्मचारीवर्ग,शरद फुलवळे, उपस्थित होते.

सचिव प्रदीप इंदुरकर, ग्रंथपाल संजय एमेकर,बाबुराव एमेकर,बळी पेठकर, निलेश गायकवाड, बळी कुरुडे,संजय फुलवळे मारोती आकुलवाड, शिवपुजे,सुंदर अशा आपल्या गोड आवाजात शंकरराव ढगे यांनी गीते गाऊन उपस्थित जनता-जनार्धनांची मने जिंकून वाह-वा मिळवली. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन दत्तात्रय एमेकर यांनी केले.
तर यावेळी शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here