Home नांदेड देगलुर बिलोली पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना.चव्हाण यांनी दिली राष्ट्रवादीच्या शाखावार यांच्या घरी भेट

देगलुर बिलोली पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना.चव्हाण यांनी दिली राष्ट्रवादीच्या शाखावार यांच्या घरी भेट

186
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलुर बिलोली पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना.चव्हाण यांनी दिली राष्ट्रवादीच्या शाखावार यांच्या घरी भेट

 

नांदेड ब्युरो चीफ / राजेश भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

 

देगलूर बिलोली मतदार संघातील आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या दुर्दैवी अकाली निधनामुळे होवु घातलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक २४ रोजी सायं. ८ सुमारास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तथा देगलुर शहरातील प्रतिष्ठित नागरिक नंदकिशोर शाखावार यांच्या निवासस्थानी सदिच्छ भेट दिली.

तर या वेळी नामधारी अशोकराव चव्हाण यांचे याठिकाणी शाखावार यांच्या नेतृत्वाखाली निराळी समाजाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

तर ना.चव्हाण यांच्या या भेटीच्या वेळी (शाखावार यांच्या वर प्रेम करणारे) निराळी समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजातील प्रतिष्ठित नागरिक व समाज बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
तर यामुळे या छोटे खाणी भेटीच्या कार्यक्रमाचे रूपांतर एका सभेत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
तर या कार्यक्रमाच्या वेळी सुरवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष लक्षमीकांतजी पदमवार यांनी सदर प्रभागाची संपूर्ण इंतभुत माहिती व त्यावरून मिळणाऱ्या मतांची रूपरेषा आपल्या भाषणाव्दारे व्यक्त केले.
त्यानंतर ना.पोखर्णा यांनी उपस्थित समुदाया समोर आपले मत भाषणातून मांडणांच कॉंग्रेस चे उमेदवार जितेश अंतापुरकर यांनाच विजयी करण्याची विनंती केली.
तर ना.अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित सर्व लोकांचे आभार मानत आपल्या भाषणाला सुरुवात केली व त्यानंतर देगलूर शहरातील विविध विकासकामांच्या विषयासह ओबीसी आरक्षणा संदर्भातही लक्ष घालणार असल्याची ग्वाही उपस्थितांसमोर बोलतांना दिली.

तसेच यावेळी देगलूर चे नगराध्यक्ष मोगलांनी शिरसेठवार, कॉंग्रेस चे देगलूर शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शंकर कंत्तेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक लक्षमीकांत पद्दमवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे देगलुर तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक अंकुश देसाई, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक बालाजी टेकाळे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश निलमवार, तुळशिराम संगमवार, संजय चिन्नमवार, कलेटवार, शशिकांत टेकाळे, राष्ट्रवादी चे पदाधिकारी नाना मोरे, संजय कद्रेकर, राष्ट्रवादी चे पदाधिकारी अनिल कोंढेकर, योगेश शाखावार, बजरंग डांगे सर, राष्ट्रवादी चे सरचिटणीस अनिल तोताडे, बालाजी गरूडकर, माधव गरूडकर, बालाजी कळसकर, कुमार कळसकर, मिरामोहीय्योदीन, हबीब सर, संजय कळसकर, गणेश गज्जेवार सह शैकडे नागरीक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.

Previous articleबाऱ्हाळी -मुखेड राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात , दोघांचा मृत्यु .
Next articleभाजपतर्फे महाविकास आघाडी सरकार विरोधात निफाडला धरणे आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here