Home नांदेड बाऱ्हाळी -मुखेड राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात , दोघांचा मृत्यु .

बाऱ्हाळी -मुखेड राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात , दोघांचा मृत्यु .

199
0

राजेंद्र पाटील राऊत

बाऱ्हाळी -मुखेड राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात , दोघांचा मृत्यु .
मुखेड प्रतिनिधी /मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क
बाऱ्हाळी ता .२९
बाऱ्हाळी ते मुखेड या राष्ट्रीय महामार्गावर दि.२८ ऑक्टोंबर रोजी कुंद्राळा येथे दुचाकीने टॅक्टरला मागुन धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर याच मार्गावर सुगाव कँम्प येथे ऑटो पलटी झाल्याने त्यातील एका वृद्धाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे .
बाऱ्हाळी – मुखेड दरम्यान राष्ट्रीय मार्गावरील कुंद्राळा पाटीजवळ मुखेडकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर क्र .एम.एच.४५ एस ०८४९ च्या पाठीमागुन येणारी दुचाकी क्र.एम.एच.२६ ए .जी.७१८७ हि ट्रॅक्टरला पाठीमागुन धडक दिली त्यात दुचाकी चालक सुधाकर भिमराव राठोड (३२ ) रा. मौलाली माळ (सुगाव बु . ) हा तरूण जागीच ठार झाला. तर त्याच गाडीवरील त्याचा पुतण्या कृष्णा राठोड हा दहा वर्षाचा बालक गंभीर जख्मी झाल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली तर अन्य एका घटनेत सुगाव कँम्प जवळ मुखेडहून प्रवाशी घेवून येणारा ऑटो क्र.एम.एच. २६ के .८३४ हा चालकाचा ताबा सुटल्याने ऑटो उलटून झालेल्या अपघातात खोबा तांडा निवळी येथिल मारोती परसराम राठोड (६० ) हा जागीच ठार झाला तर ऑटोतील अन्य चार प्रवाशी गंभीर जख्मी झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.जख्मींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदरील दोन्ही घटनेची माहीती मिळताच मुक्रमाबाद पोलीसांना मिळताच मुक्रमाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि संग्राम जाधव , यादव ईबीतवार, योगेश महेंद्रकर,बबरूवान लुंगारे आदीनी घटनास्थळी भेट देवून दोन्ही घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे .दोन्ही अपघातातील मृत बाऱ्हाळी परिसरातील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here