Home माझं गाव माझं गा-हाणं भाजपतर्फे महाविकास आघाडी सरकार विरोधात निफाडला धरणे आंदोलन

भाजपतर्फे महाविकास आघाडी सरकार विरोधात निफाडला धरणे आंदोलन

176
0

राजेंद्र पाटील राऊत

भाजपतर्फे महाविकास आघाडी सरकार विरोधात निफाडला धरणे आंदोलन

निफाड (नाशिक )-सागर कटाळे युवा मराठा न्यूज चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी –महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निफाड तहसील आवारात भाजपातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. दिवाळी जवळ आलेली असताना देखील महाविकास आघाडी सरकारकडून तालुक्यातील अनेक शेतकरी वर्गाच्या डीपी कनेक्शन कट करणे, तसेच घरगुती वीज जोडणी केली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील व तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. यात शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला बाजार भाव नसताना देखील महाविकास आघाडी सरकार वसुली करत असताना दिसत आहे. त्यामुळे निफाड तहसील आवारात महा विकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले, तर या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यतीन कदम, तालुका अध्यक्ष भागवत बोरस्ते तसेच बापू पाटील, सतीश मोरे, शंकर वाघ, प्रशांत घोडके यांनी केले. यावेळी सक्तीची वसुली त्वरित बंद करावी व लोडलेली कनेक्शन त्वरित जोडण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार व प्रांत यांना देण्यात आले.

Previous articleदेगलुर बिलोली पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना.चव्हाण यांनी दिली राष्ट्रवादीच्या शाखावार यांच्या घरी भेट
Next articleगडचिरोली:गडचिरोली सार्वजनीक बांधकाम विभाग अंतरगत पुलाचे काम न करताच रक्कमेची उचल चौकशी करण्याची जि.प.अध्यक्षाची जिल्हाअधिकार्याना निवेदनातुन मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here