Home कोल्हापूर कोल्हापूर  जिल्ह्यात आज अखेर 48 हजार 290 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर  जिल्ह्यात आज अखेर 48 हजार 290 जणांना डिस्चार्ज

142
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर  जिल्ह्यात आज अखेर 48 हजार 290 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर : जिल्ह्यात आज आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 390 प्राप्त अहवालापैकी 375 अहवाल निगेटिव्ह तर 8 अहवाल पॉझिटिव्ह (7 अहवाल नाकारण्यात आले). अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 28 प्राप्त अहवालापैकी 28 अहवाल निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 92 प्राप्त अहवालापैकी 88 निगेटिव्ह तर 4 पॉझीटिव्ह असे एकूण 12 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 186 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 290 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 160 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 12 पॉझीटिव्ह अहवालापैकी चंदगड- 1,राधानगरी-1, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 10 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-886, भुदरगड- 1236, चंदगड- 1228, गडहिंग्लज- 1505, गगनबावडा- 152, हातकणंगले-5323, कागल-1683, करवीर-5731, पन्हाळा- 1870, राधानगरी-1254, शाहूवाडी-1362, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7508, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 487 असे एकूण 47 हजार 734 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 452 असे मिळून एकूण 50 हजार 186 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 50 हजार 186 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 290 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 736 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 160 इतकी आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here