राजेंद्र पाटील राऊत
वडगांव महावितरण च्या मनमानी कारभारा विरोधात भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे लाक्षणिक उपोषण कोल्हापूर,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पेठ वडगांव महावितरण विभाग अंतर्गत वडगांव व अनेक गावांत तीन वर्षा पेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या व मनमानी व बेकायदेशीर कामे करत असलेल्या शाखा अभियंत्यांच्या विरोधात आज भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे वतीने वडगांव उपकार्यकारी अभियंता कार्यालया समोर भाजपा अल्पसंख्याक मोरचा जिल्हा सरचिटणीस तय्यब कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करणेत आले,
यावेळी आंदोलन कर्त्यांनी घोषणाबाजी करत महावितरण कार्यालय परिसर दणाणून सोडला होता तर अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी आंदोलन स्थळी येऊन मांडल्या व अनेक पक्ष संघटना यांनी जाहीर पाठिंबा ही दिला ,
महावितरण च्या वडगाव शाखा अभियंता कदम ह्यांची तीन वर्षांनंतर इतर ठिकाणी बदली होणे अनिवार्य असताना पाच वर्षे पेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असून कदम हे कामाच्या ठिकाणी रहिवाशी असणे बंधनकारक असताना चाळीस किलोमीटरवर रहिवाशी असलेचे व मनमानी व बेकायदेशीर कामे करत असून त्याचे पुरावे देण्यास तयार असल्याने त्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच कोणत्याही वीज ग्राहकांची थकीत वीज बिल वसुलीसाठी 15 दिवसाची लेखी नोटीस न देता बेकायदेशीर पणे वीज पुरवठा खंडित करनेचा उद्योग महावितरण ने तात्काळ बंद करण्यात यावा,वडगांव विभाग अंतर्गत सर्व गावातील 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या शाखा अभियंता यांच्या बदल्या करा .अश्या मागण्या दिलेल्या निवेदनात केल्या आहे ,
यावेळी दलित मित्र व जिल्हा परिषदेचे सदस्य मा अशोकराव माने व उपकार्यकारी अभियंता मा जगताप यांच्याशी चर्चा केली व तात्काळ कोल्हापूर जिल्हा मुख्य अभियंता यांचे बरोबर मीटिंग आयोजित करून वडगांव शाखा अभियंता कदम यांचे बेकायदेशीर कामाचे पुरावे सादर करण्याचे ठरविले व लाक्षणिक उपोषण स्थगित करणेत आले.
यावेळी तय्यब कुरेशी, जिल्हाध्यक्ष झाकिरभाई जमादार ,किसन मोर्चा जिल्हा सरचिटणीस नाना जाधव , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन सलगर,भाजपा तालुका उपाध्यक्ष,बंडा गोंदकर,मा.तालुका उपाध्यक्ष प्रज्योत शहा,शिवसेना ग्राहक सेनेचे तालुका उपप्रमुख रमेश माळवदे,शहर अध्यक्ष रहीम मोमीन,जावेद सय्यद,इम्तियाज मुजावर, रियाज पन्हाळकर,रियाज सनदी,आयान खाटीक,सतीश मोरे,युवराज वाळवेकर, इरफान तांबोळी, इकबाल मोमीन,इरफान मुल्ला,उपस्थित होते