Home मुंबई क्लीनअप मार्शल’ची दंडवसुलीही ऑनलाइन?क्लीनअप मार्शलबाबतच लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या ….?

क्लीनअप मार्शल’ची दंडवसुलीही ऑनलाइन?क्लीनअप मार्शलबाबतच लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या ….?

228
0

राजेंद्र पाटील राऊत

क्लीनअप मार्शल’ची दंडवसुलीही ऑनलाइन?क्लीनअप मार्शलबाबतच लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या ….?

ठाणे ( कैलास पाटील,ठाणे ब्युरो चीफ, युवा मराठा न्यूज चॅनल)

मुंबई : मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यासाठी नेमलेल्या क्लीनअप मार्शलबाबतच लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी अरेरावी, उद्धट वर्तन आणि लाचखोरी यांना आळा घालण्यासाठी ही दंडवसुली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.

करोनाला आळा घालण्यासाठी मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यासाठी पालिकेने मोठय़ा संख्येने क्लीनअप मार्शल नेमले. दुसऱ्या लाटेनंतर ही कारवाई थोडी थंडावली होती. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे ही कारवाई पुन्हा एकदा कडक करण्यात आली आहे. मात्र क्लीनअप मार्शलच्या या कारवाईबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. समाजमाध्यमांवर या कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या चित्रफिती प्रसारित होऊ लागल्या आहेत.

अनेक ठिकाणी गणवेष न घातलेले तोतया क्लीनअप मार्शलकडून दंडवसुलीच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. कधी कधी खोटय़ा पावत्या तयार करून लोकांना फसवण्याचे प्रकारही घडत असतात, तर कधी २०० रुपये दंडाची रक्कम टाळण्यासाठी नागरिकांकडूनही कमी पैसे देऊन स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रकार घडत असतात. त्यातून क्लीनअप मार्शल आपले खिसे भरत असतात. मुंबईत असे किती खोटे क्लीनअप मार्शल आहेत याची पालिकेकडे कोणतीही माहिती नाही. खोटय़ा क्लीनअप मार्शलची साखळीच कार्यरत असल्याचीही शक्यता वर्तवली जाते. घाटकोपर परिसरात मोठय़ा प्रमाणावर तोतया क्लीनअप मार्शल फिरत असल्याच्या तक्रारी वारंवीर उजेडात येत आहेत.

गणवेश न घातलेले मार्शल दिसल्यास तक्रार करावी असे आवाहनही पालिकेने केले आहे. या सगळय़ावर उपाय म्हणून लोकांकडून रोख दंडवसुलीची पद्धत बंद करता येईल का, याची चाचपणी पालिका प्रशासन करीत आहे. मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने दंडाची रक्कम वसूल करता येईल का, याची माहिती घेत असल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

Previous articleमुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाहीच…! मुंबईकरांनी नियमावली पाळावी – महापौर किशोरी पेडणेकर 🛑
Next articleयावर्षीही राज्यात गणपती नंतर आता गरब्यावरही निर्बंध?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here