Home सांस्कृतिक यावर्षीही राज्यात गणपती नंतर आता गरब्यावरही निर्बंध?

यावर्षीही राज्यात गणपती नंतर आता गरब्यावरही निर्बंध?

279
0

राजेंद्र पाटील राऊत

यावर्षीही राज्यात गणपती नंतर आता गरब्यावरही निर्बंध?

अरुण कुंभार- रायगड ब्यूरो चीफ /युवा मराठा न्युज नेटवर्क

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यानचा नवरात्रोत्सव तसेच दसरा साजरा करताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करू नये, तसेच करोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा मार्गदर्शक सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. मिरवणुकांवरही बंदी घालण्यात आली आहे. मुंबईवगळता अन्यत्र गरब्याला परवानगी दिली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले होते.

परंतु मुंबईबाहेर गरब्याला परवानगी दिली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी जाहीर केल्याने गरबा आयोजकांनी तयारी सुरू केली होती. गृह विभागाच्या नव्या निर्बंधांमुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. परिणामी, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणे किं वा मोकळ्या मैदानांमध्ये गरबा होणार नाही.

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम-रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. करोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. तसेच विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत, असेही या आदेशात म्हटले आहे.

Previous articleक्लीनअप मार्शल’ची दंडवसुलीही ऑनलाइन?क्लीनअप मार्शलबाबतच लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या ….?
Next articleमाजी सैनिक जगन्नाथ ढोले यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here