Home मुंबई मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाहीच…! मुंबईकरांनी नियमावली पाळावी – महापौर किशोरी पेडणेकर...

मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाहीच…! मुंबईकरांनी नियमावली पाळावी – महापौर किशोरी पेडणेकर 🛑

127
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाहीच…! मुंबईकरांनी नियमावली पाळावी – महापौर किशोरी पेडणेकर 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕नवरात्रीत होणाऱ्या गरब्यावर राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरात बंदी घातली आहे.

त्यामुळे, शहरात देखील नवरात्रीच्या निमित्ताने छोटेखानी कार्यक्रम करायचेत आहेत. येणाऱ्या दिवाळीसाठी जय्यत तयारी करायची आहे. पण, हे सगळं स्वतःची काळजी घेऊन आणि सर्व नियमांचं पालन करून. इतकं जरी केलंत तरी तिसऱ्या लाटेत सुरक्षित होण्यास आपण पूर्ण यशस्वी होऊ”, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईतील करोनास्थिती नियंत्रणात आल्याचं दिलासादायक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, समाधान व्यक्त करत काही सूचना देखील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्या आहेत.

“मुंबईकरांनी नियमावली पाळली, दिलेल्या सूचना ऐकल्या म्हणूनच आपण करोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवू शकलो असं म्हणायला हरकत नाही. आताही मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नक्की नाही. त्यामुळे, काळजी करायची नाही. घाबरायचं नाही. पण सांभाळायला पाहिजे”, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केलं आहे.

त्याचसोबत, नवरात्रीचा सण देखील छोटेखानी पद्धतीने साजरा केला जावा असंही महापौर म्हणाल्या.

नियमित मास्क वापरणं, लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणं या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या. आता लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.

राज्य सरकार, केंद्र सरकार यांचे आभारच. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर, टास्क फोर्स आणि तज्ज्ञ मंडळी यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण सर्व पावलं टाकत आहोत. त्यामुळे कोणीही घाबरू नका. फक्त खबरदारी घ्या”, अशा सूचना महापौरांनी केल्या आहेत.⭕

Previous articleरामानंद सागरच्या रामायणातील’ रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन.
Next articleक्लीनअप मार्शल’ची दंडवसुलीही ऑनलाइन?क्लीनअप मार्शलबाबतच लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या ….?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here