Home विदर्भ विविध मागण्यांसाठी संग्रामपूर तहसील कार्यालयसमोर तालुका ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण…!

विविध मागण्यांसाठी संग्रामपूर तहसील कार्यालयसमोर तालुका ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण…!

119
0

राजेंद्र पाटील राऊत

विविध मागण्यांसाठी संग्रामपूर तहसील कार्यालयसमोर तालुका ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण…!

बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
संग्रामपुर तालुका ग्रामरोजगार संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना सेवेत कायम करा यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी तहसील कार्यालयासमोर महात्मा गांधी जयंतीनिमित्त़ 2 ऑक्टोंबर रोजी राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याबाबत दिनांक 27 सप्टेंबर रोजी संग्रामपुर तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविण्यात आले होते.निवेदनात नमुद केलेल्या मागण्या मंजुर न झाल्यास
दि. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती यांच्या जयंतीनिमित्त़ तहसिल कार्यालयासमोर एक दिवशीय लक्षणीय उपोषण करण्याचा इशाऱ्याचे निवेदन दिले असता त्यानुसार आज दि. २/आकोटोबर महात्मा गांधी जयंती दिनी संग्रामपूर तहसिल कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांना सेवेत कायम करणे,मानधन दरमहा वैयक्तिक खात्यात जमा करणे,प्रवासभत्ता व स्टेशनरी खर्च मिळणे ,विमा संरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. हयावेळी म.रा.ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य संघटक रामेश्वर गायकी, सरपंच संघटनेच्या वतीने अमित भोंगळ,स्वाभीमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर,माजी सैनिक नंदु डाबेराव तसेच विविध संघटनाच्या पदाधिका-यांनी भेट देवुन जाहीर पाठींबा देवून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ह्या उपोषणाचे वेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघटना संग्रामपूर तालुक्याचे अध्यक्ष विनोद उमरकर , उपाध्यक्ष देविदास शिंदे,सचिव संतोष वानखडे , सहसचिव अर्जुन ढगे,जिल्हा संघटक वासुदेव गवई, बाळकृष्ण बोदळे,महिलांसह तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here