राजेंद्र पाटील राऊत
राज्याला आता शाहीन चक्रीवादळाचा धोका; अजित पवारांनी दिले ‘हे’ निर्देश
——–
मुंबई: ( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)-बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्रीवादळामुळे , मध्य महाराष्ट्र भागात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले. ( Ajit Pawar On ) वाचा: अरबी समुद्रात निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या , पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत. वाचा: उस्मानाबादमध्ये ४५९ जणांना सुरक्षितस्थळी हलवले उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या १३६.७८ टक्के पाऊस पडला आहे. आज जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीतीरावरच्या गावांत पाणी शिरले. काही गावांत ग्रामस्थ अडकून पडले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने ग्रामस्थांच्या बचावाचे कार्य सुरु केले. त्याच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ टीमची मागणी केली त्याही टीमने पूरग्रस्तांच्या बचावाचे काम करून १६ जणांचा बचाव करून सुरक्षित स्थळी हलविले तर जिल्ह्यातील ४५९ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. मांजरा धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये सतत झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाचे सर्व दरवाजे कालच उघण्यात आले. त्यामुळे धरणाखालील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यातील वाकडीवाडी येथे तीन कुटुंबांतील एकूण २० जण शेतातील घरामध्ये अडकले होते. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्या सर्वांची सुटका केली आहे. तेरणा नदीकाठी असलेल्या तेर, रामवाडी, इर्ला आणि दाऊतपूर या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना शाळेमध्ये आणि इतर सुरक्षित ठिकाणी प्रशासनामार्फत हलवले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हेलिकॉप्टर पाठविण्याची मागणी केल्यानुसार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दाऊतपूर येथील शेतामध्ये अडकून पडलेल्या सहा व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.