Home भंडारा गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध राष्ट्रपती यांना निवेदन

गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध राष्ट्रपती यांना निवेदन

180

आशाताई बच्छाव

1001077954.jpg

गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध राष्ट्रपती यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज दिनांक 23 /12/ 2024 रोजी दुपारी 2=00 वाजता जिल्हा अधीक्षक रोहिणी पाठराबे यांचे मार्फत भारताचे राष्ट्रपती व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकशाही पवित्र असलेल्या भारतीय संसदेमध्ये आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, एक फॅशन हो गया है !इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्म तक स्वर्ग मिल जाता! असे अवैज्ञानिक शब्दाचा वापर करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान केला. त्यामुळे समाजातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून अवैज्ञानिक शब्दाचा वापर केला त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावे अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा अध्यक्ष हर्षल मेश्राम ,प्रा. युवराज खोब्रागडे, चंद्रशेखर भिवगडे, नितेश बोरकर, लीलाधर बनसोड, राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर खोब्रागडे, पुरुषोत्तम गायधने, भीमराव रामटेके, बंडू ढेंगे ,जयश्री फुटाणे, शोभना शेंडे, प्रेमलता जनबंधू ,रवींद्र शेंडे, कॉम्रेड हिवराज उके ,उज्वला शेंडे, संगीता जनबंधू कृतिका शेंडे, संध्या शेंडे, यांनी निवेदन दिले. संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.