आशाताई बच्छाव
भंडारा शहरालगतच्या गावाचे पुनर्वसन करा _
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी )भंडारा शहरालगतच्या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याबाबतचे निवेदन भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरालगत येणाऱ्या अतिवृष्टी च्या पुरामुळे वारंवार बाधित होणाऱ्या 7 गावांचा विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यात यावे. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 16 साई मंदिर परिसर ,वरठी रोड गणेश नगरी ,ग्रामसेवक कॉलनी, नेहरू वार्ड गणेशपुर, सत्कारनगर नाका परिसर ,भोजापूर ,बेला, या 7 गावांचे तात्काल विशेषबाब म्हणून पुनर्वसन करण्यात यावे अशा मागण्यांचेनिवेदन देण्यात आले.






