आशाताई बच्छाव
30 डिसेंबरला विविध संघटनेच्या वतीने लाखांदूर बंदचे आयोजन
आमदार नाना पटोले नेतृत्व करणार
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) परभणी ,बीड हत्याकांड तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानांच्या निषेधार्थ लाखांदूर तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी ,बहुजन समाज पार्टी ,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने 30 डिसेंबर 2024 ला रोज सोमवारला दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक टि पॉईंट लाखांदूर येथे साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले , प्रदीप बोराडे तालुकाध्यक्ष लाखांदूर काँग्रेस कमिटी ,चंद्रशेखर टेंभुर्णी जिल्हा कार्याध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा ,नरेश दिवटे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ,विनोद ढोरे तालुका अध्यक्ष शिवसेना उबाठा गट ,चेतन बोरकर तालुका अध्यक्ष बहुजन समाज पार्टी, प्रभाकर मेश्राम तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , शीलवंत मेश्राम जिल्हाध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ,संदीप मोरे तालुका अध्यक्ष बुद्धिस्ट संघर्ष समिती लाखांदूर, गुरुदेव रामटेके तालुकाप्रमुख अखिल भारतीय समता सैनिक दल, चंद्रहास चव्हाण बहुजन एकता मंच ,राधाबाई मेश्राम अखिल धीवर विकास समिती ,यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या व बंदच्या प्रमुख मागण्यांमध्ये परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी ,तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची मदत देऊन त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी, बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येऊन त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत व एका व्यक्तीचा शासकीय नोकरी देण्यात यावी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल त्यांना पदावरून हटविण्यात यावे, या विविध मागण्यांकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन उत्तम भागटकर ,रमेश डोंगरे, सुरेश ब्राह्मणकर ,ताराबाई मातेरे, स्वप्निल ठेंगरी ,गोपाल मेंढे, देवानंद नागदेवे ,लोचन पारधी ,गोविंदराव बर्डे ,राष्ट्रपाल लोणारे, निजाम खोब्रागडे ,विनायक सरोदे, मोरेश्वर तोंडरे ,गणेश डोनटकर ,संजय बांगरे ,विश्वास मेश्राम, रामप्रकाश राऊत, संभाजी कोरे, संदीप खोब्रागडे ,चंद्रमणी गायकवाड ,निशाण डोके, रामचंद्र राऊत यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे.






