Home भंडारा मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी जि. प.सदस्या पूजा...

मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी जि. प.सदस्या पूजा हजारे यांचे प्रतिपादन

192

आशाताई बच्छाव

1001079490.jpg

मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी जि. प.सदस्या पूजा हजारे यांचे प्रतिपादन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.जो प्राशन करील तो गुरगूरल्याशिवाय राहणार नाही.शालेय शिक्षणातून बौद्धिक विकास घडवून आपले जीवनमान उंचाविता येते.शालेय शिक्षणाबरोबर खेळांना सुद्धा अतिशय महत्व आहे.मैदानी खेळातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो.विद्यार्थ्यांनी सर्वच प्रकारच्या मैदानी खेळमध्ये सहभागी होऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्यावा.त्याचप्रमाणे स्वतःबरोबरच आपल्या विद्यालयाचा नावलौकिक करावा असे प्रतिपादन पिंपळगाव ( निपानी ) जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या पुजाताई हजारे यांनी केले.

त्या अड्याळ केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसालवाडाच्या वतीने ( ता.20 ) ला तथागत विद्यालयाच्या प्रगनात आयोजित एक दिवसीय केंद्रास्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी शालेय विध्यार्थ्यांना उदघाटकीय मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केसालवाडा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल तवाडे हे होते.प्रमुख अतिथी अड्याळ पंचायत समिती पवनीचे साधन व्यक्ती संजय नंदूरकर,अड्याळ केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख रोशन ईळपाते,तथागत विद्यालयाचे मुखाध्यापक पद्माकर सावरकर,मुख्याध्यापक व्ही.एम.शेंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पत्रकार जयेंद्र चव्हाण,सदस्या नंदा चंदनबावणे, वंदना माटे,वामिना फुंडे,सरपंच धनराज वलके,उपसरपंच भीमराव बारसागडे,सदस्य नांदेश्वर फुंडे,राजेश श्रीरामे (उच्च श्रेणी मुख्याध्यापक,उत्तर बुनियादी शाळा अड्याळ ),गणेश खोकले (उच्च श्रेणी मुख्यापक,जि. प.प्राथ.शाळा पिलांद्री ) आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटिका पूजा हजारे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटोचे पूजन करून ध्वजारोहन करण्यात आले.त्यानंतर शालेय विध्यार्थ्यांच्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेला सुरबत करण्यात आली.उदघाटकीय सत्राचे संचालन निलिमा बनसोड (सहा.शिक्षिका जि..प.प्राथ.शाळा सालेवादा )यांनी केले.तर आभार उत्तर बुनियादी शाळा अड्याळ येथील सहाय्यक शिक्षिका विद्या देशमुख यांनी म्हणाले.

Previous articleसमुद्राळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात उपोषण
Next articleजाफराबाद एस.टी.महामंडळाने दुर्लक्ष पणाचा गाठला कळस एस.टी.बस पलटी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.