Home जालना जाफराबाद एस.टी.महामंडळाने दुर्लक्ष पणाचा गाठला कळस एस.टी.बस पलटी

जाफराबाद एस.टी.महामंडळाने दुर्लक्ष पणाचा गाठला कळस एस.टी.बस पलटी

564

आशाताई बच्छाव

1001079495.jpg

जाफराबाद एस.टी.महामंडळाने दुर्लक्ष पणाचा गाठला कळस एस.टी.बस पलटी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक २५/१२/२०२४

सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील एस.टी. महामंडळाची बस दिनांक २४ वर मंगळवार सकाळी ८ वाजता जाफराबाद वरून चिखली कडे प्रवाशी घेऊन जात असताना कोळेगाव पाटी जवळ एस.टी. बसचा रॉड तुटल्यामुळे एस.टी बस 20 ते 25 फूट खोल दरीत जाऊन कोसळली. त्यामध्ये 12 प्रवासी होते. कोळेगाव येथील स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढून उपचारासाठी चिखली येथे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. जखमींमध्ये वाहक आणि चालक सुध्दा होते.
जाफराबाद एस. टी.महामंडळाच्या बस इतक्या खटारा झाल्या आहेत की प्रवाशी जीव मुठीत धरून प्रवास करतात हे सर्व आगार प्रमुखाना कळत नाही का अशी चर्चा बरेच दिवसांपासून जाफराबाद तालुक्यातील नागरीक करीत होते. त्यातच आता बास पलटी झाल्यामुळे जाफराबाद आगाराची पोल खोल झाली आहे. तरी शासन दरबारी या गोष्टीची दखल घेऊन जाफराबाद आगारास नविन बस उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी जाफराबाद तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे. नविन बस उपलब्ध झाल्या नाही तर यापेक्षाही मोठ मोठे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी तालुका भर चर्चा सुरू आहे.