Home नांदेड दिव्यांग निराधारांच्या अपंग मागण्या घेऊन प्रहारचे भर पावसात आमरण उपोषण सुरु ……………………………………………….

दिव्यांग निराधारांच्या अपंग मागण्या घेऊन प्रहारचे भर पावसात आमरण उपोषण सुरु ……………………………………………….

288
0

राजेंद्र पाटील राऊत

दिव्यांग निराधारांच्या अपंग मागण्या घेऊन प्रहारचे भर पावसात आमरण उपोषण सुरु
……………………………………………………

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील दिव्यांग, वृद्ध, निराधार यांचे मानधन गेल्या सहा महिन्या पासून थकलेले आहे. स्थानिक स्वराज संस्थेतील दिव्यांगांच्या 5 टक्के निधीची अंमलबजावणी करून वृद्ध, दिव्यांग निराधाराचे मानधन तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे. आदी मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष मुखेडच्या वतीने दि.27 सप्टेंबर रोजी भर पावसात युवा जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ वडेवार व तालुकाध्यक्ष शिवानंद बंडे हे मुखेड तहसील कार्यालय समोर उपोषण केले. राज्यमंत्री बचू भाऊ कडू यांचे कार्यकर्ते भर पावसात भिजत काकडत बसलेले असताना सुद्धा प्रशासकीय कर्मचारी उपोषणकरत्याचे प्रश्न सोडवायला तयार नाहीत.यावेळी उपोषणकर्ते युवा जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ वडेवार व तालुकाध्यक्ष शिवानंद बंडे सह शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष अनिल घायाळे, युवा तालुकाध्यक्ष हणमंत मुगवणे, युवा शहराध्यक्ष राहुल कंदमवर, युवा सचिव संतोष इंगोले, शहर उपाध्यक्ष सय्यद असलम, सतीश शिंदे, माधव बिलेवाड, संजय कांबळे, रावी गायकवाड,जीवन गोरलवाड, बबलू सय्यद, मोहन घायाळे, अविनाश जाधव,विकास राठोड आदी उपस्थित होते.

Previous articleराज्याला आता शाहीन चक्रीवादळाचा धोका; अजित पवारांनी दिले ‘हे’ निर्देश
Next articleपेठ वडगावात पाच हजाराची लाच घेताना तिघांना अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here