Home नांदेड सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी जलसंधारणाच्या कामाचा आढावा

सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी जलसंधारणाच्या कामाचा आढावा

105

आशाताई बच्छाव

1001078857.jpg

सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी जलसंधारणाच्या कामाचा आढावा

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 23 डिसेंबर :- 19 ते 25 डिसेंबर सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सुशासन सप्ताहमध्ये दिर्घकालीन व शाश्वत विकासाच्या अनेक उपक्रमांना स्थानिक प्रशासनाने गती देण्याला प्राधान्य दिले आहे. आज या सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनामध्ये आज या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने यावेळी रोजगार हमी व जलसंधारणाच्या संदर्भातील आढावा घेतला. यात जलयुक्त शिवार, नरेगा, पांदण रस्ते, विहिर बांधकाम, गाळमुक्त तलाव, शेततळे, शोषखड्डे, घरकुल, चारा लागवड, बांबुलागवड तसेच जलसंधारणांतर्गत शेततळे, तुषारसिंचन, सुक्ष्मसिंचन, मृदजलसंधारण आदी संदर्भात आढावा घेण्यात आला.

पावसाळा लागण्यापूर्वी यासंदर्भातील कामांचे नियोजन आवश्यक आहे. तसेच या आर्थीक वर्षातील पुढील तीन महिने बाकी असून यामध्ये खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण यंत्रणेने याबाबत काम करावे, असे आवाहनही करण्यात आले. बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललीतकुमार वऱ्हाडे यांच्या विभाग प्रमुख उपस्थित होते.

Previous articleदेगलूर महाविद्यालय करियर कट्टाद्वारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास प्रारंभ.
Next articleवसमत शहरात राजकीय कार्यकर्ते नेते यांचा शासकिय जाग्यावर डोळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.