Home मुंबई ब्रेकींग न्यूज आरोग्य विभाग भरतीत दलालांचा सुळसुळाट..! आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यातच फक्त ५०...

ब्रेकींग न्यूज आरोग्य विभाग भरतीत दलालांचा सुळसुळाट..! आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यातच फक्त ५० हजारात सरकारी नौकरी.

381
0

राजेंद्र पाटील राऊत

ब्रेकींग न्यूज
आरोग्य विभाग भरतीत दलालांचा सुळसुळाट..! आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यातच फक्त ५० हजारात सरकारी नौकरी.

ठाणे:- ( अंकुश नारायण पवार, ठाणे शहर प्रतिनिधी,युवा मराठा न्यूज चॅनल )

“कोरोना मुळे आधीच बेरोजगारीचा दुष्काळात तेरावा
महिना…..
त्यात दलाल म्हणे ५० हजार द्याना..! “

आरोग्य विभागाची २०२१ ची भरती ही परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांमुळे, गरीब शेतकऱ्याचा मुलाला सरकारी नौकरी मिळाली म्हणून नव्हे तर आरोग्य विभागाची भरती २०२१ ची भरती आधी परीक्षा रद्द,आता दलालांचा सुळसुळाट झाल्याने गाजत आहे.

आरोग्य विभाग भरती आता १० दिवस परीक्षेचा आधी पुढे ढकलली गेली होती. विध्यार्थी अगदी परीक्षा केंद्राचा उंबरठ्यावर येऊन परत गेले. आणि आता नवीन परीक्षा लागत नाही तोवर जलाण्यातल्या आरोग्य सेवका एजंटगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे,तो साध्य फरार असल्याचे समजते.सदर आरोग्य सेवक भरती करण्यासाठी ५० हजार अडवांस मागत होता असेही समोर आले आहे. समोर असलेल्या कथित ओडियो क्लिप मधून सामाजिक कार्यकर्ता अनिल खंदारे आणि आरोग्य सेवक असलेले विनोद सावंगीकर यांनी उमेदवारांना आरोग्य विभागाची भरती करण्यासाठी ५० हजार अडवांस पैसे मागितल्याचे समोर आले आहे.
आरोग्य विभागात या ओडियो क्लिपमुळे एकच खळबळ माजली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्यात सेवेत असणारा आरोग्य सेवकच पैसाचे मागणी करतो,तर इतर राज्यात जागो- जागी दलाल उभे असतील अशी भावना आता संपूर्ण जनतेच्या मनात येऊ लागली आहे.
आधीच परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे,त्यात ह्या कथित ओडियो क्लिपमुळे आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
आता तरी होणारी परीक्षा पारदर्शक होणार की नाही? अशी महाराष्ट्रातील जनतेला, विद्यार्थ्यांना चिंता लागली आहे.
टोपे साहेब काय म्हणून प्रेस कॉन्फरन्स मध्ये गोड गोड बोलून गरीबाची चेष्टा करता:-
कोरोना मुळे आधीच बेरोजगारीचा दुष्काळात तेरावा महिना…..
त्यात दलाल म्हणे ५० हजार द्याना..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here