Home मुंबई एमपीएससी’च्या नवीन जाहिरातीना लागणार वेळ : विध्यार्थी चिंताग्रस्त!

एमपीएससी’च्या नवीन जाहिरातीना लागणार वेळ : विध्यार्थी चिंताग्रस्त!

119
0

राजेंद्र पाटील राऊत

एमपीएससी’च्या नवीन जाहिरातीना लागणार वेळ : विध्यार्थी चिंताग्रस्त!

ठाणे :(अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल)

मराठा आरक्षण, करोनामुळे पदभरतीवरील आर्थिक निर्बंधांमुळे दोन वर्षांपासून ‘एमपीएससी’ने जाहिरात काढलेली नाही. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर उपमुख्यंत्र्यांनी १५ हजार ५११ पदे भरण्याची घोषणा केल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल अशी आशा विद्यार्थ्यांना होती. मात्र, दहा दिवस उरले असतानाही कुठल्याही विभागाने मागणीपत्र न दिल्याने जाहिरातीची अपेक्षा धूसर झाली आहे
शासन निर्णयानुसार प्रशासकीय विभागांनी ३० सप्टेंबरपर्यंत विविध पदांचे मागणीपत्र पाठवणे बंधनकारक असतानाही अद्याप एकाही विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) मागणीपत्र न पाठवल्याने तूर्तास तरी नवीन पदभरतीच्या जाहिरातीची अपेक्षा धूसर झाली आहे. विशेष म्हणजे, उर्वरित दहा दिवसांमध्ये सर्व मागणीपत्र येणे शक्य नसल्याने ३० सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पदभरतीच्या जाहिरातीला नवे वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.

स्वप्निलच्या आत्महत्येनंतर उपमुख्यंत्र्यांनी १५ हजार ५११ पदे भरण्याची घोषणा केल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल अशी आशा विद्यार्थ्यांना होती. मात्र, दहा दिवस उरले असतानाही कुठल्याही विभागाने मागणीपत्र दिलेले नाही.

शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मागणीपत्र पाठवायचे आहेत. लवकरच मागणीपत्र मिळणे अपेक्षित आहे.    – स्वाती म्हसे पाटील, सचिव, एमपीएससी.

Previous articleरासेयोचा राष्ट्रीय पुरस्कारःसपना सुरेश बाबर उत्कृष्ट स्वयंसेविका
Next articleकळवण नगरपंचायत वार्ड क्रमांक 12 मध्ये विकास कामांचा शुभारंभ !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here