Home नांदेड गौरिपुजन, गणेशोत्सव निमित्त पोलिस स्टेशन मूक्रमाबाद कडून सर्व जनतेस आव्हान–सपोनि संग्राम जाधव

गौरिपुजन, गणेशोत्सव निमित्त पोलिस स्टेशन मूक्रमाबाद कडून सर्व जनतेस आव्हान–सपोनि संग्राम जाधव

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0045.jpg

गौरिपुजन, गणेशोत्सव निमित्त
पोलिस स्टेशन मूक्रमाबाद कडून सर्व जनतेस आव्हान–सपोनि संग्राम जाधव
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क

सध्या सन उत्सव असून, विशेषतः गौरीपुजन हा सण असून चोऱ्या होऊ नये यासाठी, जनतेने सतर्क राहावे

सर्व नागरिकांनी
1) सनउत्सव साजरा करताना विशेषतः गौरीपूजन वेळी खुप मोठ्या किमतीचे मौल्यवान दागिने, जास्तीचे पैसे शक्यतो पूजनासाठी ठेऊ नये.
गौरीपुजाचे दिवशी दिवसा व रात्री घरी हजर व सतर्क राहावे..
2)मौल्यवान दागीने, पैसै हे चोरी झाल्यास चोरट्यांचे हाती कपाटात ठेवल्यास सहज हाती लागते, त्यामुळे ते दुसर्‍या एखादया ठिकाणी ठेवावे.
अथवा बँक लॉकर मध्ये ठेवावे.
– जेणेकरुन घरात चोर आले तरी ते दागीने चोरांचे हाती लागणार नाही,

3)घराबाहेर पडताना व्यवस्थित लॉक करावे,शेजार्‍यांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे,
4) महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणे,( Chain snaching) सारख्या घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी.
5) आपल्य‍ा घराभोवती कुणी संशईत इसम दिसल्यास पोलीस‍ांना कळवावे.
6) रात्रीचे/ दिवसाचे वेळी संशयित व्यक्ती / वाहन दिसल्यास पोलिसांना संपर्क करावा.
7) नेहमी/ दररोज मौल्यवान वस्तू, पैसै व सोने बैठकीचे/ लक्ष असणारे खोलीत ठेवावे व त्या रात्री त्याच खोलीत झोपावे व सुरक्षा बाळगावी.
8) गावात सरपंच, उपसरपंच व प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन, तरुणांचे रात्रीचे वेळी गस्त घालण्यासाठी ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्यास पुढाकार घ्यावा.
10) गावात कायम स्वरुपी सुरक्षेसाठी ग्रामपंचायत अथवा लोकसहभागातून गावात प्रवेश करणारे रस्ते व चौकचे ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत.

मूक्रमाबाद पोलीसाकडून चोऱ्या होऊ नये यासाठी वेळोवेळी पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्यात येत असुन मनुष्यबळाचे अभावी सर्व ठिकाणी ते शक्य होत नाही.

मूक्रमाबाद पोलिस 24 तास जणतेसाठी सतर्क व मदतीसाठी तयार आहे.

तरी चोरी अथवा इतर अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ 112 अथवा पो. स्टे मूक्रमाबाद येथे खालील नंबरवर संपर्क साधावा.

पोलीस स्टेशन मुक्रमाबाद.
8999881900

Previous articleवीरभद्र मंदिरात श्री गणेशाची स्थापना.
Next articleरत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजाचे मंत्री उदय सामंत यांनी घेतले दर्शन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here