Home मराठवाडा परभणी जिल्ह्यातील नुकसानिचे पंचनामे तातडीने करून अनुदान उपलब्ध करून द्यावे. यासाठी आमदार...

परभणी जिल्ह्यातील नुकसानिचे पंचनामे तातडीने करून अनुदान उपलब्ध करून द्यावे. यासाठी आमदार मेघना दिपक साकोरे बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली.

424
0

राजेंद्र पाटील राऊत

परभणी जिल्ह्यातील नुकसानिचे पंचनामे तातडीने करून अनुदान उपलब्ध करून द्यावे. यासाठी आमदार मेघना दिपक साकोरे बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली.
परभणी,(शत्रुघ्न काकडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)   दिनांक ६सप्टेंबर पासुन सर्वत्र अतिवृष्टी झालेली आहे. काही भागात अजूनही पावसाची संततधार सुरू असून येत्या शुक्रवार पर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. हा पाऊस सर्वदूर असल्याने सर्व नद्यांना महापूर आलेला आहे. तसेच मोठ्या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने याचा फटका नदी काठांवरील गावांना बसलेला आहे. पावसाचे पाणी धरणांमधून सोडलेले पाणी यामुळे संपूर्ण शेतजमिनींना तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी शेतातील ऊभी पिके संपूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. या आस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला असून पिकांसह पशुधन वाचवायचे कसे❓ असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. या परिस्थितीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करणे अत्यंत आवश्यक आहे. ते करून जिल्ह्यातील सर्वच कोरडवाहु शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रुपये व बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजार रूपये मदत उपलब्ध करून देणे बाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. हे अनुदान लवकरात लवकर मिळावे. या साठी आपल्या स्थरावरून तातडीने योग्य पावले ऊचलावीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here