Home कोल्हापूर कोल्हापुर जिल्ह्यातिल सखोल भागातिल बेंगलोर महामार्गाची उंची वाढविण्या करिता मोहीम सर्व लोकप्रतिनिधी...

कोल्हापुर जिल्ह्यातिल सखोल भागातिल बेंगलोर महामार्गाची उंची वाढविण्या करिता मोहीम सर्व लोकप्रतिनिधी व औद्योगिक संघटनानी चालु कराण्हेयाचे नम्र अवाहन                 

327
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापुर जिल्ह्यातिल सखोल भागातिल बेंगलोर महामार्गाची उंची वाढविण्या करिता मोहीम सर्व लोकप्रतिनिधी व औद्योगिक संघटनानी चालु कराण्हेयाचे नम्र अवाहन                                  युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

२००५, २०१९ व २०२१ च्या पावसाळ्यात अतिव्रुष्टी मुळे कोल्हापुर व सांगलि जिल्ह्यातील बराचसा भाग पुरग्रहस्थ झाला. यामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेच, पण काही भागांत दुर्दैवाने जिवित हानी झाली व अर्थिक फटका देखिल प्रचंड प्रमाणात बसला ..

याच बरोबर या दोन्ही वर्षी कोल्हापुर जिल्ह्यातील पुणे – बेंगलोर महामार्गावर काहि ठिकाणी पाणि आलेने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर हि वाहतुक बंद रहिली त्याचा विपरित परिणाम हा कोल्हापुर व सांगलि जिल्ह्यातील उद्योगधंद्यानवर व व्यापारावर झाला.

कोल्हापुर व सांगलि जिल्ह्यांमध्ये इंजिनियरींग , वस्त्रोउदयोग व फुड प्रोसेसिंग चे बरेच कारखाने आहेत व या कारखान्यान मधुन देशात व विदेशात – परदेशात खुप मोठ्या प्राणात मालाचा पुरवठा होतो.

२०१९ व २०२१ या दोन्ही वर्षाच्या महापुरात पश्चिम महाराष्ट्रास जोडणारा राष्ट्रीय महामार्गवर सखोल ठिकाणी पुराचे पाणि आलेने हा महामार्ग किंमान ४ ते ५ दिवस बंद झाला व राहिला .. यामुळे कोल्हापुर व सांगलि जिल्ह्यातील इंजिनियरिंग , वस्त्रोउद्योग व इतर उद्योगांना येणारा कच्चा मालाची वाहतुक बंद झाली व पुर्णपणे ठप्प झाली, त्याचप्रमाणे या कारखान्याण मधुन तयार होणारया पक्का मालाची वाहतुक हि बंद झाली.

तसेच कोल्हापुर, इचलकरंजी सांगलि, मिरज, जयसिंगपुर व कोल्हापुर सांगलि जिल्ह्यातील इतर शहरातील घाऊक व्यापारी व किरकोळ दुकानांना येणारया मालाची वाहतुक हि ठप्प झाली, परिणामकारक या सर्व उद्योगांचे अर्थिक चक्र ठप्प झाले व मंदावले …

याचे पेक्षा गंभीर बाब म्हणजे , कोल्हापुर – सांगलि या आपल्या परिसरास महापुर येणारा भाग व परिसर तसेच आशा परिस्थितित दळनवळन बंद होणारा परिसर म्हणुन कायमचा थप्पा लागण्याचा व शिक्का बसण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे व देशांतील व परदेशातील मोठ मोठ्या कंपन्याकडुन या आपल्या परिसरातील कारखान्यांना व उद्योगांना ॲार्डर्स देताना साक्षंकता निर्माण होत चालली आहे…

तर याच अनुशंगाने भविष्यात हि अतिव्रुष्टीमुळे येणारया संभाव्य महापुरात देखिल कोल्हापुर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरळीत पणे चालु राहावा जेणे करुन या परिसरातील उद्योग व्यवसांय भविष्यातिल आशा संभाव्य परिस्थितीतही चालु राहावे व अर्थिक चक्र चालु राहावे म्हणुन जिल्हातिल लोकप्रतिनिधीनी या संदर्भात मोहिम हाती घ्यावी व पाठपुरावा करावा असे नम्र आवाहन इचलकरंजी इकॅानॅामिक डेव्हलपमेंट फोरम तर्फे करणेत आले आहे.

या मोहमी अंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रमुख औद्योगिक व व्यापारी असोशिएशनां बरोबर घेऊन जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राज्य सरकार , राष्ट्रीय महामार्ग मत्रांलय व केंद्र सरकार दरबारी या विषयां बद्दल गांभीर्य लक्षातआणुन देऊन, कोल्हापुर जिल्ह्यातील सखोल भागातील राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढवणे साठी प्रयत्नशील करावेत.

या मोहिमेत सर्व छोट्या मोठ्या उद्योगव्यवसायांनी , कारखानदारांनी तसेच इतर औद्योगिक व व्यापारी संघटनांनी सहभाग घेऊन याची पाठपुराव घेणारया जिल्ह्यातिल व राज्यातिल लोकप्रतिनिधींना पांठिंबा द्यावा असे अवाहन व विनंती इचलकरंजी इकॅानॅमिक डेव्हलपमेंट फोरम तर्फे करणेत आला आहे..जेण करुन सरकारी तांत्रिक अडचणि दुर होऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लागावा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here