Home Breaking News नांदेड स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडाकेबाज कारवाई – अवघ्या १४४ तासात विक्की...

नांदेड स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडाकेबाज कारवाई – अवघ्या १४४ तासात विक्की ठाकूरचे आठ मारेकरींना अटक

196
0

नांदेड स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडाकेबाज कारवाई – अवघ्या १४४ तासात विक्की ठाकूरचे आठ मारेकरींना अटक

नांदेड प्रतिनिधी / राजेशNभांगे

नांदेड शहरात २० जुलै रोजी विक्की ठाकूर चा खून करणाऱ्या ८ मारेकऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या कुशल नेतृत्वात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या ७ व्या दिवशी गजाआड केले आहे.पकडलेल्या अनेक जणांवर या पूर्वीचे सुद्धा खून,दरोडे असे गुन्हे नोंदवलेले आहेत.अवघ्या १४४ तासात ८ मारेकऱ्यांना जेरबंद करण्याची यशश्वी कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेने करून दाखवली आहे.

आज दिनांक २८ जुलै रोजी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती देण्यात आली.या वेळी पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे आदी उपस्थित होते.

नांदेडच्या गाडीपुरा भागात २० जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास विक्की दशरथसिंह ठाकूर (३२) या युवकावर मुसलमान व्यक्ती आपल्या डोक्यावर धारण करतात अश्या टोप्या घालून ७ जणांनी हल्ला केला.त्यात विक्की ठाकूरच्या डोक्यात गोळी मारून त्याच्या शरीरावर अनेक जखमा तलवारीने करण्यात आल्या.त्यावेळी सुरज भगवान खिराडे आणि निखिल उर्फ कालु मदने सुद्धा विक्की ठाकूर सोबत होते. इतवारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक १७६/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३०७,१२० (ब) सह अनेक कलमे आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कालमानूसारचा सुरज खिराडेच्या तक्रारीवरून दाखल झाला.त्यागुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्याकडे देण्यात आला.
या तक्रारीतील मारेकरी यादीत असणारय्रा दोन महिला अंजली नितीन बिघानिया आणि ज्योती जगदीश बिघानिया याना प्रथम अटक झाली.त्यांना पोलीस कोठडी आणि चार दिवसांनी न्यायालयीन कोठडी मिळाली. या गुन्ह्याच्या तपासात असलेले गांभीर्य ओळखून पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर मारेकऱ्यांना शोधण्याची जबाबदारी दिली.आपल्या अधिकाऱ्यांच्या हाकेला अत्यंत जलद ओ असा प्रतिसाद देत द्वारकादास चिखलीकर त्याचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे,पांडुरंग भारती,पोलीस अंमलदार गोविंद मुंढे,दशरथ जांभळीकर,संजय केंद्रे,बालाजी तेलंग,तानाजी येळगे,बालाजी यादगीरवाड, मोतीराम पवार,महेश बडगू,राजू पुल्लेवार,बालाजी मुंढे आदींनी स्थानिक पोलिसांची मदत घेत अत्यंत बारकाईने अभ्यास करून सापळा लावला आणि एकाच झटक्यात आपल्या बंदुका भरून चवथ्या मजल्यावरील खोलीत प्रवेश केला.

त्याठिकाणी नितीन जगदीश बिघानिया, लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील,दिगंबर उर्फ डीग्या टोपाजी काकडे,मुंजाजी उर्फ जब्या बालाजी धोंडगे,सोमेश सुरेश कत्ते,मयुरेश सुरेश कत्ते,कृष्णा उर्फ गब्या छगनसिंह परदेशी,तानाजी उर्फ ताना शंकर चव्हाण असे आठ जण सापडले. त्यांना पुढील तपासासाठी इतवारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले जाणार आहेत.या घटनेतील अनेक सत्य अद्याप बाहेर येणे शिल्लक आहे.
असे सुत्रांकडून सांगण्यात आले.

Previous articleमुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथील पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला
Next articleमाढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here