Home Breaking News माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात.

माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात.

238

माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी
मदतीचा हात.

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा ब्युरो  चीफ महादेव घोलप.

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावामुळे कोकण विभाग म्हणजे रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अक्षरशः पावसाने जोरदार हजेरी लावली होती.आणि बघता बघता महापूर आला.आणि त्याचा फटका पूर्णतःचिपळूणकराणा बसला,सर्व काही होत्याच नव्हत झालं, अन्न वस्त्र निवारा हे सर्व पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना मदत सर्व स्तरावरून होत असताना , सोलापूर जिल्ह्यातील
राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष श्री,संभाजी पाटील यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी चिपळूण या भागांमध्ये राष्ट्रवादी युवकची संपूर्ण टीमच्या माध्यमातून व माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथून असे सर्वांची मदत घेऊन त्यामध्ये पाणी बॉटल 400 बॉक्स , ३ टन आटा पार्ले बॉक्स 100 , मेडिकल किट , तांदूळ १ टन , गहू १ टन , चटई 100 नग , ब्लँकेट 100 नग , 5 हजार मास्क , बॉटल 500 नग घेऊन चिपळूण येथे टेम्पो रवाना करण्यात आला आहे.
त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. संभाजी पाटील,अकोले(खू) गावचे सरपंच कांतीलाल नवले, अनिल दादा तोडकर, अँड रणजित पाटील.मयुर काळे. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.