
मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथील पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला
तलावाचा बंधारा फुटण्याच्या मार्गावर असल्याने हजारो लीटर पाणी वाहून जात आहे.- पवन जगडमवार.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु) गावांची तहान भागवणारा अंबुलगा येथील पाझर तलाव यंदा पहिल्याच पावसात पुर्ण क्षमतेने तुडूंब भरलाय.या पाझर तलावा मुळे अंबुलगा गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटतो.मात्र या पाझर तलावाचा बांध जिर्ण होऊन खासुन जात आहे.तर तलावातील सांडव्याचा बंधारा फुटण्याच्या मार्गावर असल्याने बंधाऱ्याला गळती लागली आहे.त्यामुळे तलावात जमा झालेले हजारो लीटर पाणी आत्ता वाहून वाया जात आहे.
शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचा तिन तेरा झाले आहेत. जमा झालेल पाझर तलावातील हजारो लीटर पाणी बंधाऱ्यातून वाया जात असल्याने. लवकरच हा पाझर तलाव कोरडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबुलगा येथील नागरिकांना यंदा डिसेंबर महिन्यातच पाण्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे.
त्याच बरोबर या पाझर तलावाचा बांध माती आणि दगड पांसुन बांधण्यात आलेला आहे.मात्र हा बांध आत्ता जिर्ण होऊन गेल्याने त्यातून पाणी पाझरून बाहेर येत असल्याने हा बांधा फुटण्याच्या मार्गावर आहे. जर हा बांध फुटून गेल्यास पाझर तलावाच्या खालून असलेली शेकडो हेक्टर जमीन तलावाच्या पाण्यातून खरडून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे या पाझर तलावाच्या बांधाची उंची वाढवून तात्काळ बंधारा बांधावा अशी मागणी होतेय.मात्र संबधीत लघुपाटबंधारे विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नाहीये.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावी अशी मागणी होत आहे.