खा.प्रतापराव पा.चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबिर..
डॉ.सचिन पा.उमरेकर यांची माहिती
मूखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डाॅ.सचिन संभाजी पाटील उमरेकर यांनी दिली आहे.
नांदेड येथील डाॅक्टर लेन भागातील उमरेकर हाॅस्पिटल येथे आयोजित केलेले हे शिबिर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार असून या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. सचिन पाटील उमरेकर यांनी केले आहे.
राजकीय आणि सामाजिक कार्यात खासदार चिखलीकर यांचे मोलाचे योगदान आहे. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य नेहमीच त्यांच्याकडून केल्या जाते. म्हणूनच सर्वसामान्यांचे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. या लोक नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. उमरेकर म्हणाले.
या मोफत सर्व रोग निदान शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ.सचिन पा.उमरेकर, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डाॅ.सोनिया सचिन पा.उमरेकर, डाॅ. गोविंद लोणे, मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.विशाल पेदे, दंतरोग तज्ज्ञ डाॅ. माधव ढागे, कान/नाक/घसा तज्ज्ञ डाॅ. योगेश पाईकराव, रेडिओलाॅजी तज्ज्ञ डाॅ. प्राची दहाट, मायक्रोबायोलाजी तज्ज्ञ डाॅ.अनुपमा शिंदे, नेत्ररोग तज्ज्ञ डाॅ. ज्ञानेश्वर वैद्य हे नामाकिंत डाॅक्टर शिबिरात नोंदणी केलेल्या रूग्णांची तपासणी करणार आहेत.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.